Delhi Wrestler Protest: कुस्तीपटूंना न्याय मिळणार? दिल्ली पोलीस फायनल रिपोर्ट देणार; चर्चेसाठी केंद्र सरकारकडून पुन्हा आमंत्रण

Anurag Thakur Tweet: या प्रकरणात लवकरच ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Wrestlers Protest Update
Wrestlers Protest Update Saam Tv
Published On: 

Delhi Police: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Bhushan Sharan Singh) यांच्या अडचणी आणखी वाढत चालल्या आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर महिली कुस्तीपटूंनी लैगिंक छळाचा आरोप केला असून याप्रकरणाचा दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी 12 जणांची चौकशी केली असून लवकरच ते या प्ररणाचा फायनल रिपोर्ट देण्याची शक्यता आहे. अशामध्ये आता आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पुन्हा एकदा चर्चेसाठी केंद्र सरकारने बोलावले आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Wrestlers Protest Update
Biparjoy Cyclone Alert: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम, 6 राज्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट करत कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये सांगितले की, 'सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. यासाठी मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे.' दरम्यान, शनिवारीच कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अमित शाह यांनी कुस्तीपटूंना त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती बजरंग पुनियाने दिली होती. ब्रिजभूषण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुस्तीपटूंनी केली होती.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु आहे. सोमवारी रात्री दिल्ली पोलिसांचे पथक ब्रिजभूषण यांच्या घरी दाखल झाले होते. लखनऊ आणि गोंडा येथील ब्रिजभूषण यांच्या घरी जाऊन दिल्ली पोलिसांच्या एसआयटी पथकाने 12 जणांचे जबाब नोंदवले. यावेळी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यासोबतच त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्यांचे जबाब नोंदवत त्यांचे ओळखपत्र, नाव आणि पत्ते हे साक्षीदार म्हणून गोळा केले. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुन्हा दिल्लीला रवाना झाले होते.

Wrestlers Protest Update
Pune Congress News : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, नाना पटोलेंसमोरच नेत्यांनी व्यक्त केली नाराजी

दिल्ली पोलिसांनी चौकशी केलेल्या लोकांमध्ये एक ऑलिम्पिक गेम्सची मेडल विजेता खेळाडू, एक कॉमनवेल्थ गेम्सची मेडल विजेता खेळाडू आणि एका इंटरनॅशनल रेफरीचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांची लखनऊमध्येच चौकशी केली होती. आता या चौकशीनंतर दिल्ली पोलीस लवकरच फायनल रिपोर्ट देण्याच्या तयारीमध्ये आहेत. दरम्यान, सोमवारी कुस्तीपटू आपल्या रेल्वेतील नोकरीवर परतले. त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त आले होते. पण त्यांनी ते फेटाळून लावले. बजरंग पुनिया याने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com