महायुद्ध अटळ! छोटीशी ठिणगी उडवेल युद्धाचा भडका, भारतालाही बसणार फटका

Ukraine Gaza Sudan War Global Impact : जगभरातील वाढते संघर्ष, युद्धाची शक्यता आणि त्याचा भारतावर होणारा संभाव्य परिणाम. युक्रेन, गाझा, सुदान, काँगोमधील युद्धस्थितीचा सविस्तर आढावा.
Smoke rises over conflict zones as global tensions escalate across multiple regions.
Smoke rises over conflict zones as global tensions escalate across multiple regions.Saam Tv
Published On

जग सध्या अशा परिस्थितीतून जात आहे, जिथे कधीही युद्ध होऊ शकते आणि कोणतेही युद्ध संपूर्ण जागतिक संकटात रूपांतरित होऊ शकते. या परिस्थितीपासून आपणही वाचू शकत नाही. जगातील घडामोडींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो.

Smoke rises over conflict zones as global tensions escalate across multiple regions.
Delhi High Court : लिव्ह-इन पार्टनर्सना पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

नवी दिल्ली: नवीन वर्षाची सुरुवात नुकतीच झाली होती आणि जगभरात नववर्षाचा उत्साह असतानाच 3 जानेवारी रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई केली. या कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करून अमेरिकेत नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. अमेरिकेने या मोहिमेला ऑपरेशन अ‍ॅब्सल्यूट रिझॉल्व असे नाव दिले असून, ही कारवाई ‘नार्को-टेररिझम’विरोधात असल्याचे सांगण्यात आले.

Smoke rises over conflict zones as global tensions escalate across multiple regions.
Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

मात्र ही एकमेव लष्करी कारवाई नाही. गाझा, युक्रेन, काँगो, सुदान अशा अनेक भागांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहेत. काही ठिकाणी हवाई हल्ले आणि गोळीबार सुरू आहे, तर काही देशांमध्ये केवळ एका ठिणगीचीच कमतरता असून युद्ध भडकण्याची शक्यता आहे.

Smoke rises over conflict zones as global tensions escalate across multiple regions.
Ayodhya News : अयोध्या धाम आणि पंचक्रोशी परिक्रमा मार्गावर ऑनलाईन मांसाहारी फूड विक्रीवर बंदी, नेमकं कारण काय?

बारुदाच्या वासात अडकलेले देश

रशिया – 🇺🇦 युक्रेन

रशिया आणि युक्रेनमधील संबंध 2014 पासूनच तणावपूर्ण आहेत. रशियाने क्रीमिया ताब्यात घेतल्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर थेट हल्ला केला आणि तेव्हापासून युद्ध सुरू आहे. नाटोचा विस्तार रशियाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. या युद्धात आतापर्यंत रशियाचे 11 लाखांहून अधिक सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचा दावा केला जात आहे.

Smoke rises over conflict zones as global tensions escalate across multiple regions.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरूच, आणखी एका तरुणाला विष देऊन मारलं

इस्रायल – 🇵🇸 हमास

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलचे सुमारे 1200 नागरिक ठार झाले आणि अनेकांना बंधक बनवण्यात आले. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी इस्रायलने युद्धाची घोषणा करत गाझा पट्टीवर हवाई आणि जमीनी हल्ले सुरू केले. हा संघर्ष अजूनही तीव्र स्वरूपात सुरू आहे.

🇨🇩 काँगो – 🇷🇼 रवांडा

काँगो आणि रवांडामधील संघर्ष अनेक दशकांपासून सुरू आहे. 2022 नंतर पूर्व काँगोमध्ये M23 या बंडखोर गटाने हिंसाचार वाढवला. जानेवारी 2025 मध्ये या गटाने उत्तर किवु प्रांताची राजधानी गोमा आणि नंतर दक्षिण किवुतील बुकेवू ताब्यात घेतले. जून 2025 मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने शांती करार झाला, मात्र तो पूर्णपणे अजूनही शांत करता आलेला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, या संघर्षात हजारो लोक ठार झाले असून 90 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहे तर काही स्थलांतरित झाले आहे.

सुदान

सुदानमध्ये राष्ट्रीय लष्कर (SAF) आणि अर्धसैनिक दल (RSF) यांच्यात 15 एप्रिल 2023 पासून संघर्ष सुरू आहे. सत्ता आणि नियंत्रणासाठी हा संघर्ष पेटला आहे. आतापर्यंत सुमारे 1.5 कोटी लोक प्रस्थापित झाले असून, हा संघर्ष जगातील सर्वात मोठ्या मानवी संकटांपैकी एक मानला जातो. अमेरिकेने मानवी युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता, मात्र सुदानी लष्कराने RSF शरण आल्याशिवाय युद्ध संपणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com