Chhattisgarh Bus Accident: कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू

Chhattisgarh Durg Bus Accident : दुर्ग जिल्ह्यात बस दरीत कोसळल्याची घटना घडलीय. ही बस केडिया डिस्टिलरीच्या 27 कर्मचाऱ्यांसह कुम्हारीहून भिलाईला परतत होती. त्यावेळी बस 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
Bus Accident
Chhattisgarh Bus Accidentani

Chhattisgarh Bus Accident 11 people killed :

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात बस दरीत कोसळल्याची घटना घडलीय. या अपघातात 11 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. तसेच अनेक कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात रात्री ९ वाजता घडला. सध्या मदतकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस केडिया डिस्टिलरीच्या 27 कर्मचाऱ्यांसह कुम्हारीहून भिलाईला परतत होती. त्यावेळी बस 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. (Latest News)

या अपघातस्थळी एसडीआरएफ आणि पोलिसांचे पथक पोहोचले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस परतत असताना खपरी रोडवरील पारा खाणीच्या मुरूम खाणीत बस कोसळल्याची घटना घडली.

कारखान्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. गंभीर जखमींना रायपूरला पाठवण्यात आले आहे. या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे मदतकार्य सुरू असून त्यासोबतच काही जणांना प्राथमिक उपचारासाठी धमधाच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. रायपूरचे पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींची प्रकृती अत्यंत बिकट आहे.

त्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अपघातस्थळी दाखल होताच बचावकार्य सुरू करण्यात आले. मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले असून बस खाणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Bus Accident
Uttarakhand Road Accident : उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये भीषण दुर्घटना, जीप दरीत कोसळली; 8 जणांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com