Women Reservation Bill 2023 : तुम्ही लॉलीपॉपसारखं विधेयक फिरवत बसलात; भाजप खासदाराचा काँग्रेसवर पलटवार

Congress Vs BJP : महिला आरक्षण विधेयकावरून लोकसभेत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली.
Women Reservation Bill, Sonia Gandhi And Nishikant Dubey
Women Reservation Bill, Sonia Gandhi And Nishikant DubeySAAM TV
Published On

Congress Vs BJP Over Women Reservation Bill 2023 :

महिला आरक्षण विधेयकावरून लोकसभेत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली. या विधेयकाला पाठिंबा देतानाच, सोनिया गांधींनी विधेयक आणण्यास होत असलेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी जोरदार पलटवार केला.

आम्ही विधेयक आणलं तर, काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलंय, असा टोला भाजप खासदार दुबे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशातील महिलांना सन्मान दिला. हा देश संविधानावर चालतो. आताच सोनिया गांधी म्हणाल्या की, हे विधेयक लवकरात लवकर लागू केला पाहिजे. पण राज्यसभेत कोणतेही आरक्षण नसेल. मग कसे आरक्षण देता येईल? तुम्ही लॉलीपॉपसारखं हे विधेयक फिरवत राहिलात, असा टोला दुबे यांनी लगावला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोनिया गांधी काय म्हणाल्या?

महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना सोनिया गांधींनी होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या १३ वर्षांपासून महिला आपल्यावरील जबाबदारीच्या प्रतीक्षेत आहेत. महिलांना या विधेयकासाठी किती काळ वाट पाहावी लागणार आहे? हा महिलांवर अन्याय आहे, असं सोनिया म्हणाल्या.

सर्व अडथळे दूर करून हे विधेयक अंमलात आणावे. हे विधेयक तात्काळ लागू करावे. परंतु, जातनिहाय जनगणना, एससी, एसटी, ओबीसी महिलांना आरक्षणात स्थान दिले जावे, असेही त्या म्हणाल्या.

Women Reservation Bill, Sonia Gandhi And Nishikant Dubey
Women's Reservation Bill: महिला आरक्षणासाठी 2029 पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा? नेमकं काय आहे कारण...

दुबेंचे प्रत्युत्तर

भाजपने लोकसभेत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, काँग्रेसने अनेक वर्षे हे विधेयक प्रलंबित ठेवले. हे विधेयक काँग्रेसचे नाही, भाजप आणि पंतप्रधानांचे आहे. जो गोल डागतो, त्यालाच त्याचे श्रेय मिळते, असं दुबे म्हणाले.

Women Reservation Bill, Sonia Gandhi And Nishikant Dubey
Womens Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाला माझा पाठिंबा, तात्काळ लागू करा : सोनिया गांधी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com