Uttarakhand News: उत्तराखंडमधील हेमकुंड साहिब मार्गावर (Hemkund Sahib Marg) हिमस्खलन (Avalanche Hits) झाल्याची घटना समोर आली आहे. या हिमस्खलनामध्ये सहा भाविक बर्फाखाली अडकले होते. यामधील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला. तर रेस्कू करुन पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाच्या घटना सुरूच आहेत. उत्तराखंडमध्ये रविवारी पुन्हा एकदा हिमस्खलनाची घटना घडली. हेमलकुंड साहिब यात्रेसाठी आलेले भाविक हिमस्खलनामुळे बर्फाखाली अडकले. हेमलकुंड यात्रा मार्गावर एक किलोमीटर अंतरावर अटलाकोटीच्या निकट येथे ही घटना घडली. हे सर्व भाविक दर्शन घेऊन परत येत होते त्याचवेळी ही घटना घडली.
एसडीएम जोशीमठ कुमकुम जोशी यांनी सांगितले की, ही घटना रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. हिमस्खलनामध्ये भलामोठा हिमखडा तुटून रस्त्यावर कोसळला. या बर्फाखाली सहा भाविक अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हेमकुंड साहिबच्या सेवकांसोबत घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन करत पाच भाविकांचे प्राण वाचवले.
रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. या घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला. हे भाविक अमृतसह येथून आले होते. दहा भाविकांचा ग्रुप याठिकाणी दर्शनसाठी आला होता. यामधील सहा जण हिमस्खलनात अडकले होते. यातील एका महिलेचा मृत्यू झाला तर पाच जण बचावले. तर तीन महिला आणि दोन पुरुष भाविकांना वाचवण्यात यश आले. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव कमलजीत कौर (३७ वर्षे) असे असून त्या अमृतसह येथील राहणाऱ्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.