Iran-Israel War : अमेरिका युद्धात उतरणार? ट्रम्पनं इराणला धमकावलं; भूगोल बदलवणारं युद्ध होणार

Iran-Israel War : इस्रायल इराणच्या युद्धात आता अमेरिकेनं महत्वाची भूमिका घेतलीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला जबरदस्त हल्ला करण्याचा इशारा दिल्यानं या युद्धात आता आणखीन तेल ओतलं गेलंय. या युद्धानं जगात काय होऊ शकतं पाहा.
Iran-Israel War
Iran-Israel War Saam Tv News
Published On

इस्रायलनं केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा निश्चय करत इराणनं मशिदीवर लाल निशाण फडकावलंय. त्यामुळे आता जो समोर येईल त्याला तुडवत इराण इस्रायलवर आक्रमण करणारेय. इराणच्या या आक्रमक पवित्र्यानंतर ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिलाय.

ट्रम्पची इराणला धमकी

जर आमच्यावर इराणनं कोणत्याही प्रकारे हल्ला केला तर अमेरिकन सैन्य पुर्ण ताकदीनं इराणवर तुटून पडेल, जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेलं नसेल असा हल्ला होईल. मी इराण आमि इस्रायलमध्ये करार करुन देऊ शकतो आणि हा रक्तरंजित लढा सहज संपवू शकतो. इराणनं तेहरान आणि वॉशिंग्टन डीसी दरम्यान सुरु असलेला आण्विक चर्चेचा सहावा टप्पा रद्द करुन आम्ही कोणाला घाबरत नाही असा थेट संदेश ट्रम्प यांना दिलाय. त्यामुळे जर आता आपल्या मित्र राष्ट्राला पाठींबा देण्यासाठी अमेरिका या युद्धात उतरला तर मात्र मध्य पुर्वेत तणाव वाढणारेय.

Iran-Israel War
Israel Attacks Iran : इस्रायलचा पुन्हा एकदा इराणवर हल्ला; राजधानी तेहरानमध्ये नागरिकांची पळापळ, धडकी भरवणारा व्हिडिओ

अमेरिका युद्ध भडकवणार?

होर्मूझची सामुद्रधुनीवर युद्धाचा प्रभाव

जगात ७०% तेलाच्या वाहतूकीसाठी हाच मार्ग

ओमानचा उपसागर आणि पर्शियन आखात जोडणारा सागरी मार्ग

सैन्य आणि राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील भाग

मध्य पुर्व मध्ये अमेरिकेचे ४० हजार सैनिक तैनात असून यापैकी अनेक छोट्या मोठ्या देशात अमेरिकेची सैन्य तळं आहेत. त्यामुळे या युद्धात अमेरिकेला झळ बसणार असल्याची शक्यता आहे. आणि जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर चीन आणि रशियाची भूमिका ही निर्णायक ठरेल. त्यामुळे सध्या इराण आणि इस्रायलच्या वादात जग तिसऱ्या महायुद्धात तर भरडलं जाणार नाही याचीही भिती जगाला आहे.

Iran-Israel War
Ahmedabad Plane Crash : मृतदेहाच्या बॅगेत दोन शीर आढळले, कुटुंबियांनी घातला गोंधळ, म्हणाले- अवशेष नको तर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com