Kanchanjunga Express Accident : प्रवाशांच्या किंचाळ्या अन् धावा; भीषण रेल्वे अपघाताची थरकाप उडवणारी दृश्ये, PHOTO

West Bengal Train Accident: पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाचजणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
कांचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात
Kanchanjunga Express AccidentSaam Tv
Published on
पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात
Kanchanjunga Express Accident Photo Saam Tv

पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे रुळावर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेस गाडीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे.

रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले
Kanchanjunga Express Accident ViewsSaam Tv

या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातात अनेकजण जखमी
West Bengal Train AccidentSaam Tv

अपघातात अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे. प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात रंगपानी आणि निजबारी दरम्यान ही घटना घडली.

 मालगाडीने धडक दिली
West Bengal Train Accident PhotoSaam Tv

मिळालेल्या माहितीनुसार, ही कांचनजंगा एक्सप्रेस न्यू जलपाईगुडीहून सियालदहच्या दिशेने जात होती. तेव्हा मागून येणाऱ्या मालगाडीने तिला धडक दिली. ट्रेनमध्ये अनेक लोक अडकले असण्याची शक्यता आहे.

रेल्वेचे डबे कोसळले
Express AccidentSaam Tv

मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे वाहतूकही प्रभावित झाली आहे. अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर उभ्या करण्यात आल्या आहेत.

कांचनजंगा एक्स्प्रेस अपघात
Train Accident In West BengalSaam Tv

आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास १३१७४ कांचनजंगा एक्स्प्रेस आगरतळाहून सियालदहला जात असताना हा अपघात झाला आहे. प्रवाशांना अधिक मदत करण्यासाठी नैहाटी स्थानकावर अतिरिक्त हेल्प डेस्कही उभारण्यात येत आहे.

रेल्वेचा भीषण अपघात
Train Accident PhotosSaam Tv

अपघातानंतर मुसळधार पावसात घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे.

घटनास्थळी भयानक दृश्य
Railway Accident PhotoSaam Tv

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी भयानक दृश्य दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com