Crime News: मुलीसाठी नवऱ्यानं किडनी विकली, बायको १० लाख घेऊन बॉयफ्रेंडसोबत फरार

Relationship betrayal case: पतीने १० लाख रूपयांसाठी किडनी विकली खरी, पण किडनी विकून जे पैसे आले, ते पैसे पत्नीने स्वत:कडे ठेवले. नंतर आपल्या प्रियकरासोबत पत्नीनं पलायन केलं.
Crime News
Crime NewsSaam Tv News
Published On

बायकोनं आधी नवऱ्याला किडनी विकायला भाग पाडले. नवऱ्यानं १० लाख रूपयांसाठी किडनी विकली खरी, पण किडनी विकून जे पैसे आले, ते पैसे बायकोनं स्वत:कडे ठेवले. मुलीच्या भविष्यासाठी बँकेत पैसे ठेवत असल्याचं तिनं सांगितलं. पण पैसे बँकेत न ठेवता आपल्या बॉयफ्रेंडसोबत बायकोनं पलायन केलं. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हावडा येथे घडली असून, या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हावडा जिल्ह्यातील संकरेल येथे एका चित्रकाराचे घर आहे. त्यांना पत्नी आणि १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे. फक्त चित्र काढून त्यांचा उदरनिर्वाह होत नसे. तसेच मुलीच्या शिक्षणासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे. त्यांचे हालाखीचे दिवस सुरू होते. त्यामुळे बायको नवऱ्याला म्हणाली 'तु तुझी किडनी विकून टाक. यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होईल.'

Crime News
PPF investment benefits: दररोज फक्त १०० रूपये गुंतवा अन् १० लाख मिळवा, सरकारी योजनेमुळे व्हाल मालामाल

किडनी विकण्यासाठी पत्नी वारंवार पतीवर दबाव टाकत होती. 'तुमचे शरीर एका किडनीवर कार्य करेल. पण आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे मुलीचे आयुष्य अंधारात येऊ शकते आणि याला जबाबदार तुम्हीच असाल.' असं पत्नी म्हणाली. मुलीच्या भवितव्याचा विचार करून पतीने किडनी विकण्यास होकार दिला. त्याने एक किडनी १० लाख रूपयांना विकली.

Crime News
Pune News: पोलीस वसाहत २ दिवस पाण्याविना, लाईटही गुल; वीजबिल थकल्यानं पाणीपुरवठा खंडित

पत्नीनं ते १० लाख रूपये घेतले आणि ही रक्कम बँकेत जमा करणार असल्याचं तिनं सांगितलं. पण पत्नीनं ती रक्कम बँकेत जमा केली नाही. रातोरात पत्नी आपल्या प्रियकरासोबत पैसे घेऊन फरार झाली. पत्नी फरार झाल्यानंतर पतीनं शोधकार्य सुरू केलं. तेव्हा पतीला पत्नी बराकपूरच्या रविदास नावाच्या व्यक्तीसोबत पळून गेली असल्याचं समजलं. पती रवीदासच्या घरी गेला. तेव्हा पत्नीनं घटस्फोट देणार असल्याचं सांगितलं. या घटनेनंतर पतीनं थेट पोलीस ठाणे गाठले आणि पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com