CM सुवेंदु अधिकारींचे पहिल्याच कॅबिनेटमध्ये 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सुसाट!

Suvendu Adhikari First Cabinet Decisions Details: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय घेतले. BSF साठी जमीन हस्तांतरण, आयुष्मान भारत योजना लागू आणि प्रशासनिक सुधारणा यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत.
West Bengal Chief Minister Suvendu Adhikari chairs his first cabinet meeting, announcing major policy decisions.
West Bengal Chief Minister Suvendu Adhikari chairs his first cabinet meeting, announcing major policy decisions.saam tv
Published On

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुवेंदु अधिकारी हे अॅक्शन मोडमध्ये आले असून पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आहे. सुवेंदु अधिकारी म्हणाले की, इतर 20 NDA शासित राज्यांप्रमाणेच बंगालचे मंत्रिमंडळ हे डबल इंजिन सरकार प्रमाणे सुसाट धावेल. मुख्यमंत्री सुवेंदु यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यापैकी सर्वात मोठा निर्णय म्हणजे सीमेवरील जमिनीचे हस्तांतरण 45 दिवसांच्या आत सीमा सुरक्षा दलाकडे (BSF) सोपवले जाईल.

West Bengal Chief Minister Suvendu Adhikari chairs his first cabinet meeting, announcing major policy decisions.
Vijay Wadettiwar | ओबीसींचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न- विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मंत्रिमंडळ बैठकीतील 5 धडाकेबाज निर्णय

321 भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना आधार

राजकीय हिंसाचारात हत्या झालेल्या भाजपच्या 321 कार्यकर्त्यांच्या कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेईल, असा भावनिक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकारी प्रशिक्षणाला मंजूरी

IAS आणि IPS अधिकाऱ्यांना आता केंद्रीय प्रशिक्षणात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी केंद्र-राज्य वादामुळे या प्रक्रियेत मोठे अडथळे येत होते.

BSF दलाला जमीन हस्तांतरण

सीमावर्ती जिल्ह्यांमधील बदलती लोकसंख्या आणि घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर कुंपण घालण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेली जमीन पुढील 45 दिवसांच्या आत BSF कडे हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

West Bengal Chief Minister Suvendu Adhikari chairs his first cabinet meeting, announcing major policy decisions.
PM Modi: भारतावर मोठं संकट? वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटिंग सुरू करा; PM मोदींच्या आवाहनामागे काय अर्थ दडलाय?

नवीन फौजदारी (BNS) लागू

देशात लागू झालेली भारतीय न्याय संहिता आता बंगालमध्ये लागू होईल. तृणमूल सरकारने मागील वर्षी संविधानिक नियमांचे उल्लंघन करून जुन्याच कायद्यांवर (IPS/CrPC) काम सुरू ठेवले होते. असा आरोप अधिकारी यांनी केला.

आयुष्य्मान भारत योजनेची अंमलबजावणी

ममता बॅनर्जी सरकारने थांबवलेली केंद्र सरकारची आयुष्य्मान योजना आता संपूर्ण बंगालमध्ये लागू केली जाईल. यामुळे राज्यातील गरीब कुटुंबांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचारांची सुविधा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com