Mamata Banerjee: खळबळ! मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या घरात घुसण्याचा शस्त्रधारी तरुणाचा प्रयत्न

ममता बॅनर्जी यांच्या घरात शस्त्रधारी तरुणाने घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Mamata Banerjee news
Mamata Banerjee news saam tv

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या घरात शस्त्रधारी तरुणाने घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कोलकाता पोलील, सुरक्षा रक्षकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या शस्त्रधारी तरुणाला अडवलं. शेख नूर आलम असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याची झडती घेत त्याच्याजवळील शस्त्र, चाकू जप्त केले. तसेच त्याच्याकडून त्याचं ओळखपत्रही जप्त केले आले आहे.

Mamata Banerjee news
Modi Surname Case: मोदी आडनाव प्रकरण! सुप्रीम कोर्टाची गुजरात सरकार अन् पूर्णेश मोदींना नोटीस; १० दिवसात उत्तर द्यावे लागणार

'आरोपी शेख नूर आलम हा स्टीकर लावलेल्या एका वाहनातून प्रवास करत होता. पोलीस, एसटीएफ, स्पेशल ब्रँचने आरोपीची चौकशी सुरू केली आहे, असेही आयुक्त विनीत गोयल यांनी सांगितलं.

वर्षभरापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या घरात याआधी देखील घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. कोलकातामधील सरकारी बंगल्यात ३ जुलै २०२२ रोजी रात्रीच्या एक वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने घुसघोरीचा प्रयत्न केला होता. त्या व्यक्तीची संशयित हालचाल पाहून सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

Mamata Banerjee news
Sanjay Raut On PM Modi: 'पंतप्रधानांच्या कृतीमागे राजकीय स्वार्थ, स्वार्थाशिवाय ते काहीच करत नाही', मणिपूरच्या घटनेवरुन संजय राऊतांचे टिकास्त्र

दरम्यान, ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या होत्या. त्यांना पायाला दुखापत झाली होती. दुखापत झाल्यानंतर कोलकातामधील रुग्णालयात दाखल केले होते.

पायाला दुखापत झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, काही लोकांनी कारमध्ये असताना धक्का दिला. त्यानंतर जबरदस्तीने कारचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आलाट. यामुळे ममता बॅनर्जी दुखापतग्रस्त झाल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com