
पश्चिम बंगालमधील भांगर भागात हिंसाचार उफाळून आलाय. तेथील प्रादेशिक पक्ष आयएसएफच्या (इंडियन सेक्युलर फ्रंट) समर्थकांना कोलकात्याकडे जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर तेथे परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांनी रस्ता रोखल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले, त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्ये झटापट झाली.
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पांगविण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्यानंतर जमाव अधिक संतप्त झाला त्यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली काही वाहने पेटवून दिली. व्हिडिओमध्ये पोलिसांचे एक वाहन खराब झालेले दिसत आहे. तर काही आंदोलनकर्ते अनेक दुचाकी जळताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) च्या समर्थकांकडून वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. निदर्शनकर्त्यांनी कोलकाता येथे भरलेल्या बसेस वाटेतच थांबवल्या. वक्फ कायद्याविरोधात मालदा, मुर्शिदाबादसह पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उफाळून आलाय.
सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर हिंसाचार भडकवल्याचा आरोप करत आहेत. आयएसएफ हा प्रादेशिक पक्ष आहे. पोलिसांनी भांगरहून येणाऱ्या आयएसएफ कार्यकर्त्यांच्या वाहनांना कोलकात्याच्या रामलीला मैदानाकडे जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी बसंती एक्सप्रेसवे रोखला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.