Rain Alert: सावधान! पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा; हवामान खात्याच्या अंदाज, 'या' राज्यांना अलर्ट

IMD Weather Update: पुढील दोन दिवसांत दक्षिणी तमिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Weather Update IMD Warn Unseasonal rain Tamil Nadu Karnataka Arunachal Pradesh Maharashtra
Weather Update IMD Warn Unseasonal rain Tamil Nadu Karnataka Arunachal Pradesh MaharashtraSaam TV
Published On

IMD Weather Update

मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. अनेक राज्यांमध्ये हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. काश्मीरच्या मैदानी भागात बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. तर झारखंडमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मात्र पुन्हा एकदा अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Weather Update IMD Warn Unseasonal rain Tamil Nadu Karnataka Arunachal Pradesh Maharashtra
Nagar-Kalyan Highway Accident: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू

तामिळनाडूत सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. IMD च्या मते, जम्मू आणि काश्मीरला लागून असलेल्या उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत दक्षिणी तमिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

उर्वरित तामिळनाडू आणि किनारी कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिण किनारपट्टी भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलंय.

उत्तर भारतात हुडहुडी वाढली

काश्मीरच्या मैदानी भागात बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. राजधानी दिल्लीतील तापमानाचा पारा झपाट्याने खाली गेला आहे. हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात थंडी झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी, पूर्वांचल आणि बिहारच्या अनेक भागात किमान तापमानात सातत्याने घट होत आहे.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल जाणवत आहे. काही भागात थंडी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पुढील दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील किमान तापमानात २१ डिसेंबरनंतर वाढ होण्याचा अंदाज आहे.

Weather Update IMD Warn Unseasonal rain Tamil Nadu Karnataka Arunachal Pradesh Maharashtra
Rashi Bhavishya: वादविवाद टाळा महत्वाची कामे पुढे ढकला; 'या' राशींसाठी सोमवार संकटाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com