"आम्ही आज खूप खुश आहोत" - काशी विश्वनाथ धाम लोकार्पणानंतर फडणवीसांची भावना...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात आले. मोदींना गंगा मातेने का बोलवले याचा आज प्रत्यय येतो असं फडणवीस म्हणाले.
"आम्ही आज खूप खुश आहोत" - काशी विश्वनाथ धाम लोकार्पणानंतर फडणवीसांची भावना...
"आम्ही आज खूप खुश आहोत" - काशी विश्वनाथ धाम लोकार्पणानंतर फडणवीसांची भावना...Saam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशाताील वाराणासीच्या काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात आले. राज्यात देखील हा सोहळा पाहता यावा यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या बाबूलनाथ मंदिरात (Temple) देखील या सोहळ्याचे प्रक्षेपण सुरू आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहिल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील याचवेळी बाबूलनाथ येथे दर्शनासाठी आले आहेत. ("We are very happy today" - Feelings of Fadnavis after the dedication of Kashi Vishwanath Dham)

हे देखील पहा -

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही आज खूप खुश आहोत. आमची प्राचीन मंदिरं आक्रमकांनी नष्ट केली होती. मागच्या काळात नष्ट केलेली अनेक ठिकाणी मंदिरे शिवाजी महाराजांनी वाचवली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी तोडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. ज्यावेळी पंतप्रधान (PM Modi) काशीला गेले होते तेव्हा ते म्हणाले, "न मुझे किसिने भेजा, ना मै आया हु... है मुझे मा गंगाने बुलाया है" त्यांना गंगा मातेने का बोलवले याचा आज प्रत्यय येतो असं फडणवीस म्हणाले. तसेच मी आज राजकीय प्रश्नांना उत्तर देणार नाही, आमचं राष्ट्र, भारत देश आणि राज्यावरील अरिष्ट दूर कर असे मी भोलेनाथाकडे मागितले आहे असं फडणवीसांनी सांगितलं.

"आम्ही आज खूप खुश आहोत" - काशी विश्वनाथ धाम लोकार्पणानंतर फडणवीसांची भावना...
'श्री काशी विश्वनाथ धाम'चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन...

असा असेल मोदींचा दौरा -

'श्री काशी विश्वनाथ धाम' 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदी आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com