Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Wayanad Lok Sabha Election Result 2024 Updates: वायनाड या लोकसभेच्या जागेसाठी प्रियंका गांधी ह्या संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा (युडीएफ) च्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्धात मार्क्सवादी कम्युनिस्टी पार्टीच्या नेतृत्वातील डावी लोकशाही आघाडीने सत्यन मोकेरी यांना मैदानात उतरवले आहे.
Priyanka Gandhi News
Priyanka Gandhi Saam Digital
Published On

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर केरळच्या वायनाड लोकसभा जागेवर पोट निवडणूक होत आहे. आज येथील मतदानाची मतमोजणी केली जात आहे. सुरुवातीच्या निकालानंतर प्रियंका गांझी ह्या मोठ्या विजयाकडे वाटचाल करतांना दिसत आहेत. तर भाजप उमेदवार पिछाडीवर पडलेत.

प्रियंका गांधी ह्या मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. आतापर्यंत त्यांना 357165 मते मिळाली आहेत. तर सीपीआयचे उमेदवार सत्यन मोकेरी यांना 122130 मिळाली आहेत. जर भाजप तिसऱ्या स्थानी असून भाजपचे उमेदवार नव्या हरिदास यांना 67058 मते मिळाली आहेत.तर प्रियंका गांधी ह्या तब्बल 235035 मतांनी आघाडीवर आहेत.

या जागेवर राहुल गांधींनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. या जागेवर ते दुसऱ्यांदा खासदार बनले होते. यावेळी त्यांनी डाव्या विचारसरणीचे लोकशाही आघाडीचे सीपीआयचे उमेदवार एनी राजा यांना 3 लाख 64 हजार पेक्षा अधिक मतांनी पराभूत केलं होत. या जागेबरोबर राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघातूनही लोकसभा निवडणूक लढवली होती.

Priyanka Gandhi News
Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

परंतु त्यांनी राय बरेली यांनी येथील खासदारकी कायम ठेवत वायनाड येथील खासदारकीचा राजीनामा दिला. यामुळे येथे लोकसभा पोटनिवडणूक घेतली गेली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली असून त्या पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत.

मागील निवडणुकीत लोकसभा जागेसाठी 73.57 टक्के मतदान झालं होतं. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एकूण 6,47,445 मते मिळाली होती, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी एनी राजा यांना मात्र 2,83,023 मते मिळाली होती. त्यावेळीही भाजपचे उमेदवार हे तिसऱ्या स्थानी राहिले होते. भाजपकडून सुरेंद्रन यांना फक्त 141,045 मते मिळाली होती.

Priyanka Gandhi News
Jharkhand Exit Poll : झारखंडमध्ये कुणाची सत्ता? कुणाला किती जागा मिळणार?

तर यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संयुक्त लोकशाही मोर्चाकडून उमेदवारी घेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्धात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडीचे सत्यन मोकेरी हे रिंगणात आहेत. तर भाजपकडून नव्या हरिदास यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान या पोटनिवडणुकीच्या १६ उमेदवारांचं भाग्य ईव्हीएममध्ये कैद झालंय.

दक्षिण भारतातील केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघ हा हायप्रोफाईल राहिलाय. २०१९ मध्ये राहुल गांधी अमेठीमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. येथील जनतेने त्यांना खासदार बनवून संसदेत पाठवलं होतं. २०२४ मध्येही राहुल गांधींनी या जागेवरून विजय मिळवला होता. कर्नाटक आणि तमिळनाडूच्या सीमेवर असलेल्या केरळच्या वायनाड मतदारसंघाला राजकीयदृष्टीने महत्त्व प्राप्त झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com