फासावर जरी चढवलं तरी मी वंदे मातरम...; AIMIM नेते वारिस पठाण नेमकं काय म्हणाले?

Waris Pathan’s Vande Mataram Remark Ignites Political Controversy: AIMIM नेते वारिस पठाण यांच्या ‘फासावर चढवलं तरी वंदे मातरम गाणार नाही’ या वक्तव्याने राजकीय वाद पेटला आहे. पठाण यांनी नेमकं काय म्हटलं? मराठी भाषा, विद्यार्थी आंदोलन आणि ईद-ए-मिलादच्या दारूबंदीबाबतही जाणून घ्या.
WARIS PATHAN ON VANDE MATARAM
WARIS PATHAN ON VANDE MATARAMsaam tv
Published On

वंदे मातरमवरून देशात चांगलेच राजकारण पेटले असून आता याच मुद्द्यावर AIMIM चे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मला फाशीवर जरी चढवले तरी मी वंदे मातरम गाणार नाही, असे पठाण यांनी म्हटले आहे. मात्र, आम्ही वंदे मातरम् गीताचा सन्मान करतो, परंतु ते कोणावरही जबरदस्तीने लादता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

WARIS PATHAN ON VANDE MATARAM
राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्याची तयारी, भाजप संसदेत प्रस्ताव आणणार; खासदाराने सगळा प्लान सांगितला

वारिस पठाण यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. GenZ आणि विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करू नये, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना पठाण म्हणाले की, तरुणांनी जे आंदोलन केले त्यानंतर सरकारला झुकावे लागले असून आम्ही तरूणांसोबत आहोत. मात्र या मुद्यावर राजकारण करणे योग्य नाही.

WARIS PATHAN ON VANDE MATARAM
मोठी बातमी! शिंदें-फडणवीसांवर मनोज जरांगे भडकले; 'त्या' वक्तव्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले

वारिस पठाण यांनी फडणवीस सरकारवरही टीका केली. मराठी भाषा सर्वांनी शिकली पाहिजे, मात्र भीती दाखवून, धमकावून किंवा नोटीस पाठवून मराठी शिकवणे योग्य नाही असे ते म्हणाले. तसेच हिम्मत असेल तर बॉलिवूडमधील कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींसाठीही मराठी अनिवार्य करा. असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

WARIS PATHAN ON VANDE MATARAM
Shiv Sena case: निवडणूक आयोगाने अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्या? शिवसेना नाव-चिन्हाच्या वादात कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तीवाद

वारिस पठाण यांनी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक दिवस दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. देशात समानता असून संविधान सर्वांसाठी सारखेच आहे, असे सांगत त्यांनी म्हटले की, ज्या पद्धतीने हिंदू सणांच्या दिवशी दारू तसेच मांस-मटण विक्रीवर निर्बंध घातले जातात, त्याचप्रमाणे 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादच्या दिवशी महाराष्ट्रातील दारूची दुकाने बंद ठेवावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com