Russia Election 2024: निवडणूक जिंकताच पुतिन यांच्याकडून थेट तिसऱ्या महायुद्धाचा इशारा; अमेरिकेची उडवली खिल्ली

Vladimir Putin News: निवडणुकीचा निकाल लागताच पुतिन यांनी थेट तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. इतकंच नाही, तर त्यांनी अमेरिकेतील लोकशाहीची खिल्ली देखील उडवली आहे.
Russia Election 2024 Latest News
Russia Election 2024 Latest News ANI
Published On

Russia Election 2024 Latest News

रशियामध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी तब्बल ८८ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे पुतिन पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागताच पुतिन यांनी थेट तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. इतकंच नाही, तर त्यांनी अमेरिकेतील लोकशाहीची खिल्ली देखील उडवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Russia Election 2024 Latest News
RSS New Executive : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर; कोणत्या पदावर कोणाची नियुक्ती? जाणून घ्या

रशियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (ता. १५) सलग तीन मतदान सुरू होतं. त्यानंतर लागलेल्या निकालात पुतिन यांनी ८८ टक्के मतं मिळवत विजय मिळवला. पुतिन यांचे कट्टर विरोधक ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झाला होता. (Latest Marathi News)

त्यामुळे ७१ वर्षीय पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली. मात्र, निवडणुकीत पुतिन यांनी एकतर्फी विजय मिळवला. आता ते पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत. विशेष बाब म्हणजे, १९९९ पासून रशियात पुतिनराजच आहे.

बोरिस येल्तसिन यांनी १९९९ मध्ये त्यांच्याकडे सत्तेची सूत्र सोपवली होती. तेव्हापासून पुतिन एकही निवडणूक हरलेले नाहीत. दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर पुतिन यांनी सोमवारी (ता. १८) रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर भाष्य करत थेट तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला.

गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि पश्चिमेकडील देशांचे संबंध बरेच ताणले गेले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गेल्या महिन्यातच रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य करत भविष्यात युक्रेनमध्ये सैन्य उतरवण्याची गरज पडली, तर आम्ही तयार आहोत, असा इशारा दिला होता.

यावर पुतिन यांना विचारले असता, 'आजच्या आधुनिक युगात काहीही शक्य आहे, पण तसे झाले तर तिसरे महायुद्ध फार दूर नाही', असं पुतिन यांनी म्हटलं आहे. आम्ही चर्चेसाठी तयार असून केवळ असून रशियाबाबत कुणीही कटकास्थान रचण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, रशियाच्या निवडणुकीवर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी टीका केली होती. यावरून बोलताना अमेरिकेत काय चालले आहे, हे आम्हाला माहिती आहे. आज संपूर्ण जग त्यांच्यावर (अमेरिका) हसत आहे, असं म्हणत पुतिन यांनी अमेरिकेच्या लोकशाहीची खिल्ली उडवली आहे.

Russia Election 2024 Latest News
Accident News: भरधाव कारची ट्रॅकरला पाठीमागून जोरदार धडक; लग्नाहून परतणाऱ्या ८ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com