Virat Kohli Viral Video Fact Check : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ९ ऑगस्ट रोजी झालेल्या ज्युनियर डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणामुळे देश हादरलाय. देशात संतापाची लाट उमटली आहे. खेळाडू, कलाकार, व्यावसायिकासह नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण व्यक्त होत आहे. यातच महिला अत्याचारावर बोलताना माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत विराट कोहली कोलकातामध्ये झालेल्या घटनेसंदर्भात बोलत असल्याचा दावा अनेकांनी केलाय. सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट शेअर करण्यात येत आहे. या व्हिडिओची पडताळणी करण्यात आली. विराट कोहलीचा हा व्हिडिओ आताचा नसल्याचं समोर आलेय.
विराट कोहलीचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ आताचा असल्याचा दावा खोटा निघाला आहे. विराट कोहलीचा व्हायरल व्हिडिओ 2017 मधील आहे, जेव्हा बेंगळुरूमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात छेडछाड केल्याबद्दल नाराजी त्याने व्यक्त केली होती.
व्हायरल व्हिडिओत विराट कोहली म्हणतोय की, "हे खूपच त्रासदायक आणि धक्कादायक आहे. या समाजाचा एक भाग असल्याची मला लाज वाटतेय. आपण आपली विचारसरणी बदललायला हवी. पुरुष आणि महिलांसोबत एकसारखं वागले पाहिजे. महिलांचा सन्मान करण्याची गरज आहे."
विराट कोहली पुढे म्हणतो, "जेव्हा असे काही घडते, तेव्हा लोक त्याबद्दल काहीही करत नाहीत. पण मला वाटतेय ही भ्याडपणाची गोष्ट आहे. अशा लोकांना स्वत:ला पुरुष म्हणण्याचा अधिकार नाही. माझा एकच प्रश्न आहे की, देव करो अन् असं व्होऊ नये...पण तुमच्या कुटुंबातील कुणासोबत असे घडले तर तुम्ही उभे राहून पाहाल की मदत कराल."
विराट कोहलीचा हा व्हिडीओ आताचा नाही. हा व्हिडिओ ६ जानेवारी २०१७ मधील आहे. विराट कोहलीने आपल्या ट्वीटर खात्यावर पोस्ट केला होता. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ डाऊनलोड करुन आताचा असल्याचे पोस्ट केले. त्यामुळे नेटकऱ्यांकडून करण्यात येत असलेला दावा खोटा आणि निर्धार असल्याचं दिसून येतेय. याशिवाय गुगलवर सर्च केले असता कोलकाता बलात्कार प्रकरणाशी संबंधित विराट कोहलीने आतापर्यंत कोणतेही वक्तव्य अथवा पोसट केलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.