Video: 'देव तारी त्याला कोण मारी' १६ सेकंदात दोन वेळा मृत्यूला दिला चकवा; थरारक घटनेतून मिळेल मोठा संदेश

Delhi Accident Viral Video | एवढ्या भीषण अपघातातून हा दुचाकीस्वार बचावला त्याला एक मोठं कारण आहे.
God helps those who wear helmet
God helps those who wear helmetTwitter/@DelhiPolice
Published On

मुंबई: देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. याचा प्रत्यय आणणारा एक व्हिडिओ (Viral Video) नुकताच समोर आला आहे. ज्यात एका व्यक्तिने १६ सेकंदात तब्बल दोन वेळा मृत्यूला चकवा दिला आहे. हा व्हिडिओ बघायला थरारक असला तर त्यातून एक मोठी गोष्ट शिकायला मिळते. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ शेयर केल्यापासून या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं असून तो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. (Delhi Accident Viral Video)

God helps those who wear helmet
बँकेचा मोठा निष्काळजीपणा; खोक्यात नोटा ठेवल्या; पाणी शिरल्याने 42 लाखांचा झाला लगदा

व्हायरल व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडओत दिसतंय की, एक कार वळत असताना अचानक एक दुचाकी (Bike) मागून येते आणि कारला धडकते. या धडकेत दुचाकीस्वाराचा अपघात (Accident) होऊन तो बराच लांब फेकला जातो. सुदैवाने या दुचाकीस्वाराला काही लागत नाही आणि तो पुन्हा आपल्या पायावर उभा राहतो. म्हणजेच एवढ्या मोठ्या अपघातातून तो अगदी सुखरुप बचावला. पण, त्याच्या यमदूताने अजूनही हार मानली नव्हती, अपघातातून उभं राहिल्यानंतर काही सेकंदातच वीजेचा पोल अचानकपणे त्या व्यक्तीच्या डोक्यावर पडला. यावेळीही तो व्यक्ती खाली पडला. मात्र, देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय जे म्हणतात तो हाच! एका अपघातानंतर सलग दुसऱ्या अपघातातूनही हा व्यक्ती सुखरुपपणे बचावला आहे.

God helps those who wear helmet
Amazon Sale 2022 : अॅमेझॉनवर इतके दिवस आहे सेल ! जाणून घ्या, कोणत्या गोष्टीवर मिळेल सुट

दोन अपघातानंतरही कसा बचावला व्यक्ती?

हा थरारक व्हिडिओ पाहताना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. पण, एवढ्या भीषण अपघातातून हा दुचाकीस्वार बचावला त्याला एक मोठं कारण आहे. ते म्हणजे दुचाकीस्वाराने डोक्यावर लावलेले हेल्मेट! या हेल्मेटमुळेच तो दुचाकीस्वार एवढ्या भीषण अपघातातून बचावला आहे. जर हेल्मेट नसते तर कदाचित तो दुचाकीस्वार बचावलाही नसता. त्यामुळे नेगमीच हेल्मेटचा वापर करा आणि सुरक्षित राहा (God helps those who wear helmet) असं आवाहन करत दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ शेयर केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com