Amazon Sale 2022 : भारतात आता सणासुदीला सुरुवात झाली आहे. आपल्या प्रत्येक सणाला आपण खरेदी करत असतो. गणपती, दसरा, दिवाळी यावेळी खूप खरेदी होते.
सध्या कामाच्या गडबडीमुळे व व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी आपण काही शॉपिंग (Shopping) साइट्सला भेट देतो. काही शॉपिंग साइट्स आपल्याला कमी सवलतीत हव्या त्या वस्तू देतात.
सध्याच्या काळात महागाई वाढल्यामुळे आपण बरेच वेळा विचार करतो ही वस्तू आपण घेतली पाहिजे की नाही. अशा वेळी डिस्काउंट मिळेल का याची सुद्धा वाट बघतो.
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२२ सेल (Amazon Great Indian Festival 2022 sale)२३ सप्टेंबरपासून सुरू होईल. या फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये SBI कार्डधारकांना १० टक्के तात्काळ सूट दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना त्यांच्या पहिल्या खरेदीवर फ्लॅट १० टक्के कॅशबॅक (Cashback) देखील मिळणार आहे. या सेलचे (sale) प्रायोजक Samsung Galaxy M आणि iQoo हे आहेत. यामुळेच सेलमध्ये या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर चांगल्या ऑफर्स पाहायला मिळू शकतात.
आपण ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२२ बाबत आपल्याला आतापासूनच हूरहूर लागून राहिली असेल तर आपण आत्ताच Amazon वर लाइव्ह डिल्स देखील पाहू शकतो.
या प्रोडक्ट्सवर मिळेल तगडी सूट
- अॅमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना ७५०० रुपयांपर्यंत बक्षीस ऑफर केले जाणार आहेत.
- अॅमेझॉन पे (Amazon Pay) चा वापर करणाऱ्याला ५० रुपये कॅशबॅक दिले जाणार आहे.
- ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यानंतर २ हजार ५०० रुपयांचा वेलकम ऑफर दिले जातील.
- Amazon Pay Later वर ६० हजार रुपयांपर्यंत इंस्टेंट क्रेडिट वर १५० रुपयाचा फायदा मिळेल.
- Amazon Pay UPI वर ५० रुपयाचा कॅशबॅक दिले जाईल.
- Amazon Pay गिफ्ट कार्ड वर १० टक्के डिस्काउंट मिळेल.
- ४९ रुपयाच्या सुरुवातीत किंमतीत होम आणि किचन प्रोडक्टला खरेदी केले जाऊ शकते.
- ४० टक्के सूट वर मोबाइल आणि एसेसरीजला खरेदी केले जाऊ शकते. १९९९ रुपयाच्या ईएमआयवर मोबाइल खरेदी करता येईल. सोबत बजेट फोनला ५९९९ रुपयात खरेदी करू शकता.
- ९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट आणि एसेसरीजला खरेदी करू शकता येईल.
Amazon कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, प्राइम मेंबर्संना ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२२ सेलमध्ये लवकर प्रवेश दिला जाईल. तर २३ सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल. सेल दरम्यान, ग्राहक OnePlus, Samsung, Xiaomi आणि iQoo सारख्या कंपन्यांकडून स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर ४० टक्के सवलतीची अपेक्षा करू शकतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.