Viral Video: ती ३३ वर्षाची लेक अन् तिचा आभाळाएवढा बाप! व्हायरल व्हिडिओने मीडिया जगत झाले भावूक

जेव्हा तिच्या वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. इतकेच नव्हेतर तिच्या वडिलांनी यावर 'तु माझं आयुष्य आहेस,' अशी कमेंटही केली आहे.
Father And Daughter Emotional Viral Video
Father And Daughter Emotional Viral VideoSaamtv
Published On

Daugahter Father Viral Video: आई वडिलांच आपल्या मुला बाळांवर जितकं प्रेम असत, ज्याची सर दुसऱ्या कोणत्याही नात्याला येत नाही. खास करुन वडिलांचे आपल्या मुलीवर असलेले प्रेम जबरदस्तच. लहानपणी बोट धरायला चालायला शिकवण्यापासून ते मोठेपणी प्रत्येक गोष्टीत काळजी करणारे बाप- लेकीचे नाते ग्रेटच असते.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका बापलेकीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. काय आहे या व्हायरल व्हिडिओची संपूर्ण कहाणी, चला जाणून घेवू.. (Viral Video)

Father And Daughter Emotional Viral Video
Udhav Thackeray: औरंगाबादचं झालं 'छत्रपती संभाजीनगर'! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले; 'माझ्या शेवटच्या बैठकीत...'

वडिल आपल्या कुटूंबासाठी, मुलाबाळांसाठी नेहमीच धडपडत असतात, काळजी करत असतात. स्वतःच्या हौसमौजेची कसलीही तमा न बाळगता ते आपल्या लेकरांच्या सुखासाठी सदैव झटत असतात. मुलं मोठी होतात, पण आई वडिलांसाठी ते आयुष्यभर लहानच असतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओही असाच बाप लेकीच्या नात्याबद्दल आहे.

इंस्टाग्राम (Instagram) युजर श्रीलक्ष्मीने हा व्हिडिओ तिच्या अकाउंटवरुन शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिचे वडील ती ३३ वर्षांची असूनही लहान असल्याप्रमाणे कशी काळजी करतात हे सांगितले आहे.

Father And Daughter Emotional Viral Video
Sambhajinagar: बाळासाहेब ठाकरेंची ती ऐतिहासिक सभा अन् त्यांचं स्वप्न...; जाणून घ्या 'संभाजीनगर'च्या नामांतराचा ३४ वर्षापूर्वीचा इतिहास....

आपण लहान असताना शाळेत, बाहेर जाताना सोडायला बाबा नक्की यायचे पण ३३ वर्षाच्या मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडायला जाऊन, तिची बसण्याची सीट, तिकिट याबद्दलची खात्री करुनच माघारी परततात असे या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. व्हिडिओ शेअर करताना श्रीलक्ष्मीने सांगितले की ती ३३ वर्षांची आहे, तरीही तिचे वडील तिला स्टेशनवर सोडण्यासाठी येतात आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतरच तेथून निघून जातात.

हा व्हिडिओ तरुणीने तिच्या वडिलांच्या नकळत रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये तिचे वडील पुढे चालताना दिसत आहेत तर मुलगी मागे सर्व रेकॉर्ड करत आहे. या व्हिडिओला ६२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

श्रीलक्ष्मीने कॅप्शनमध्ये सांगितले की, "जेव्हा तिच्या वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. इतकेच नव्हेतर तिच्या वडिलांनी यावर 'तु माझं आयुष्य आहेस,' अशी कमेंटही केली आहे. या व्हिडिओने मीडिया जगतालाही भावूक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com