Viral Video : थम्सअपवाली पाणीपुरी; स्वाद चाखताच महिला पडली प्रेमात; शेअर केला भन्नाट व्हिडिओ

सर्वांनाच तिखट आणि आंबड अशी पाणीपूरी खायला आवडते.
Viral Video
Viral VideoSaam TV
Published On: 

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजकाल अनेक तरुण स्वत:चा व्लॉग बनवताना दिसतात. स्ट्रीट फूडमुळे फुडव्लॉगर्सची संख्या वाढत चालली आहे. मुंबई असो किंवा दिल्ली किंवा मग अन्य कोणतंही शहर सगळीकडेच पाणीपुरी हे स्ट्रीट फूड सर्वाधिक पसंतीच आहे. सर्वांनाच तिखट आणि आंबड अशी पाणीपूरी खायला आवडते. (Latest Viral Video)

पुदिन्याचं पाणी आणि आंबट-गोड चटणी याने पाणीपुरी नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अशात बाजारात सध्या अनेक प्रकारच्या पाणीपुरी आल्या आहेत. यामध्ये गोड आणि तिखट पाणीपुरीसह पुदीना स्पेशल, लेमन, चॉकलट असे काही फ्लेवर्स पाणीपुरीमध्ये आलेत. तुम्हीही जर पाणीपुरी प्रेमी असाल तर तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या पाणीपुरी खाल्ल्या असतील. मात्र तुम्ही कधी थम्सअप पाणीपुरी खाल्ली आहे का?

Viral Video
Viral Video: लग्नाला नकार देताच चिडला, केस पकडून वार करत भर चौकातून फरफटत नेले; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

सध्या सोशल मीडियावर याच थम्सअप पाणीपुरीची चर्चा रंगली आहे. एका महिलेने या पाणीपुरीचा अस्वाद घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये महिला मस्त चवीने पाणीपुरी खाताना दिसत आहे. अगदी आपल्या नॉर्मल पाणीपुरी प्रमाणे भय्या पुरीमध्ये मसाला टाकत आहे आणि त्यात पाणीपुरीचे पाणी न टाकता थम्सअप टाकत आहे. ही पाणीपुरी पाहून अनेक थम्सअप प्रेमींना ती खाण्याचा मोह झाला आहे.

Viral Video
Viral Photo: अभिनेत्याने दुसऱ्या पत्नीला दिला धोका? तिसऱ्या पत्नी आणि मुलासोबतचे फोटो व्हायरल

तसेच काही व्यक्तींना ही पाणीपुरी पाहून विचित्र वाटत आहे. पाणीपुरी नेहमीच आंबट गोड तिखट अशा चवीची असते. मात्र दर सुक्या पाणीपुरीत थम्सअप टाकलं तर त्याची चव जाईल असं काही नेटकरी म्हणत आहेत.महिलेने आपल्या फूड व्लॉगमध्ये हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने येथील ठिकाणची देखील माहिती दिली आहे. थम्सअपवाली ही पाणीपुरी कोलकत्ता येथे विकली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.