Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Vaishno Devi Yatra Suspended: जम्मू-काश्मिरमधील वैष्णो देवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. भाविकांना देखील परत जाण्याचे आवाहन केले जात आहे. खराब हवामानामुळे यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?
Vaishno Devi YatraSaam Tv
Published On

Summary -

  • मुसळधार पावसामुळे वैष्णो देवी यात्रा पूर्णपणे थांबवली.

  • भाविकांना सुरक्षिततेसाठी परत जाण्याचे आवाहन.

  • ढगफुटी आणि भूस्खलनाचा धोका कायम.

  • परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू होणार.

जम्मू-काश्मिरमध्ये निसर्गाने कोप केला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक दुर्घटना घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. ढगफुटी, भूस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सततच्या खराब हवामानामुळे आणि हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टमुळे जम्मूच्या कटरा येथे वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. भाविकांना परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याठिकाणी नवीन प्रवाशांना यात्रेसाठी प्रवेश मिळू नये म्हणून ट्रॅव्हल स्लिप काउंटर देखील बंद करण्यात आले आहेत.

यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने कटरा बाजारात फिरण्यासही बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेता यात्रेकरूंना उघड्यावर जाऊ देणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांना सावधान आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. यात्रेसाठी आधीच निघालेल्या भाविकांनाही लवकरात लवकर कटरा येथे परतण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी कोणत्याही अनुचित घटना टाळता याव्यात यासाठी लाऊडस्पीकरद्वारे सतत घोषणा दिल्या जात आहेत.

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?
Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन, किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय

हवामान विभागाने पुढील काही तासांत जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या जम्मू-काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगफुटीची देखील घटना घडली आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच प्रवास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाचे सांगितले आहे. जोपर्यंत पावसाची परिस्थिती आहे तोपर्यंत याठिकाणी यात्रेकरूंनी येऊ नये असे आवाहन केले जात आहे.

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?
Jammu Kashmir Cloudburst: किश्तवाडमध्ये पुन्हा ढगफुटी; 10 जणांचा मृत्यू,बचाव कार्य सुरू

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली होती यामध्ये ६० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर २०० जण बेपत्ता झाले होते. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळावर बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. अजूनही बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे. ही ढगफुटीची घटना ताजी असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रविवारी पहाटे दोन ठिकाणी ढगफुटीत झाली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आणि ६ जण जखमी झाले आहेत.

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?
Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com