Shocking: दीराच्या प्रेमात वेडीपीशी झाली वहिनी, दारू पाजून नवऱ्याचा काटा काढला; रक्तरंजित प्लॅन कसा रचला?

Love Turned Deadly: अलीगढमध्ये विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या! वहिनीने आपल्या दीराच्या मदतीने नवऱ्याला संपवले. पोलिसांनी अवघ्या २४ तासात दोघांनाही अटक केली आहे.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

दीराच्या प्रेमात अखंड बुडालेल्या वहिनीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील एका गावातून समोर येत आहे. आरोपी महिलेचं पतीच्या चुलत भावासोबत सुत जुळलं होतं. तिचं लग्नापूर्वीच त्याच्यासोबत अफेअर सुरू होतं. जेव्हा पतीला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या नात्याला विरोध केला. त्यांच्यातील वाद वाढू लागले. दरम्यान, दोघांनी मिळून पतीला संपवण्याचा कट रचला.

ही धक्कादायक घटना १७ जूनच्या रात्रीच्या सुमारास घडली. ऋषी कुमार असे मृत व्यक्तीचे नाव असून, ललिता असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. ललिताचे नीरजसोबत अवैध संबंध होते. लग्नापूर्वीपासून त्यांचे अफेअर सुरू होते. एसपी ग्रामीण अमृत जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरजने ऋषीला दारू देण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले. दुसऱ्या दिवशी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तीन पथके तयार करून तपासाला सुरूवात केली.

Crime News
Pune Crime: 'तू जा मर', चाळिशीतल्या महिलेचं २१ वर्षीय तरूणासोबत अफेअर; पतीला कळताच स्वत:लाच संपवलं, पुढे जे घडलं..

पोलिसांनी तपास करून ललिता आणि नीरजला अटक केली आहे. अमृत जैन म्हणाले की, तपासानंतर असे समोर आले की, ललिताचे आपल्या दिरासोबत अवैध संबंध होते. घटनेच्या दिवशी ललिता आरोपीच्या घरीही गेला होता. दोघांनीही घर सोडून दुसरीकडे राहण्याचा प्लॅन केला होता.

Crime News
Surat Tragedy: आई वडील केक खरेदी करायला गेले, वाढदिवसालाच मुलानं आयुष्य संपवलं; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

एसपी म्हणाले की, तिन्ही पथकांनी २४ तासांच्या आत तपास करून दीर आणि मृताच्या पत्नीला अटक केली आहे. ही संपूर्ण घटना प्रेमप्रकरण आणि अवैध संबंधांमुळे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com