उत्तरकाशीतील बोगद्यातून अडकेल्या ४१ मजुरांना १७ दिवसांनतर सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या ४१ मजुरांना बाहेर काढल्यानंतर पुष्पहार घालून स्वागत केलं आहे. या मजुरांचे नातेवाई देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. या मजुरांचं खुद्द उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वागत केलं. आता या ४१ मजुरांवर उपचार करण्यासाठी सरकार सज्ज असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
मीडिया वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर या मजुरांना लवकरच रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. या मजुरांसाठी ३० किलोमीटर अंतरावर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये ४१ खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आलं आहे.
'घटनास्थळी डॉक्टरांची टीम हजर आहे. तसेच ४१ रुग्णवाहिका देखील होत्या. त्यांना रुग्णालयात लवकर दाखल करण्यासाठी २ हेलीकॉप्टर देखील होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
'बोगद्यातील या मजुरांना एयरलिप्ट करण्यासाठी चिन्यालीसौडमध्ये एक हेलीकॉप्टर देखील सज्ज होतं, अशी माहिती त्यांनी दिली. (Uttarakhand Tunnel Rescue Update)
'41 मजूर गेल्या १६ दिवसांपासून बोगद्यात राहिल्याने त्यांना मनावर आघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोगद्यातून बाहेर पडल्यानंतरही गेल्या १७ दिवसांची आठवण येऊ शकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मानसोपचारतज्ज्ञ ४१ मजुरांच्या संपर्कात होते. बोगद्यातून बाहेर पडल्यानंतरही मानसोपचारतज्ज्ञ त्यांच्या संपर्कात राहतील, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, 'गेल्या १७ दिवसांपासून अंधारात राहिल्याने मजुरांच्या डोळ्यांवर सूर्य किरणांचा परिणाम होऊ नये, यासाठी काळ्या रंगाचे चष्मे देखील आणण्यात आले होते. त्यांना काही दिवस काळ्या रंगाचे चष्मे घालण्यास सांगितले आहे, असंही त्यांनी सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.