देहरादून: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात रविवारी झालेल्या भीषण अपघातात (Accident) २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील ३० यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. हा अपघात यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर दामटा ते बर्नीगड दरम्यान घडला. सध्या जखमींना प्राथमिक उपचारासाठी दामटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघात झालेल्या बसचा चालक दोन दिवसांपासून झोपला नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Uttarkashi Bus Accident)
या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. २५ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Pm Narendra Modi) अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर केली आहे. उत्तराखंडमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून २ लाख रुपये दिले जातील, असे म्हटले आहे. त्याचबरोबर ५०,००० रुपये दिले जातील.
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य जलद गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्य करत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. (Uttarkashi Bus Accident)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.