पत्नीच्या डिलिव्हिरीसाठी पैसे देण्यास वडिलांचा नकार, तरूणानं आयुष्य संपवलं; अंत्यविधीनंतर बायकोनं दिला बाळाला जन्म

Baby Born Hours After Fathers Cremation in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे पतीच्या अंत्यसंस्कारानंतर सात तासांत बायकोनं मुलाला जन्म दिला.
Baby Born Hours After Fathers Cremation in Uttar Pradesh
Baby Born Hours After Fathers Cremation in Uttar PradeshSaam
Published On

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथे एका महिलेनं तिच्या पतीच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या सात तासांत बाळाला जन्म दिल्याची हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाघाट पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी बेचेलाल यांनी सोमवारी सायंकाळी कौटुंबिक तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सात तासात तिनं महिलेनं बाळाला जन्म दिला.

वृत्तानुसार, बेचेलालने या वर्षी काजलशी लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या एका महिन्यातच काजल गर्भवती राहिली. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी बेचेलालने वडिलांकडून आर्थिक मदत मागितली. परंतु, त्याच्या वडिलांनी नकार दिला. यामुळे व्यथित होऊन, सोमवारी सायंकाळच्या सुमारास तरूणानं गळफास घेऊन आत्महत्या केली.

Baby Born Hours After Fathers Cremation in Uttar Pradesh
सोनं डाऊन, चांदी अप; लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला कात्री, आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

याची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर बेचेलाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बेचेलाल यांच्या पत्नीला प्रसुती वेदना सुरू झाल्या. कुटुंबियांनी तिला तातडीने रूग्णालयात दाखल केले. तिनं रात्री उशिरा मुलाला जन्म दिला.

Baby Born Hours After Fathers Cremation in Uttar Pradesh
रूळावर महिलेचा मृतदेह; संतप्त जमावाचा २ पोलिसांवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये नेमकं घडलं काय?

पतीच्या अंत्यसंस्काराच्या चितेला आग लागल्यानंतर अवघ्या सात तासांतच बाळाचा जन्म झाला. यामुळे गावातून शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुबियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काजलच्या पालकांनी जावईच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. बेचेलाल यांना त्यांचे वडील आणि मेहुणे छळत होते, असा आरोप त्यांनी केला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com