Uttar Pradesh : पोलिस अधिकारी लाच घेताना सापडला; CM योगींनी थेट हवालदार बनवलं, वाचा नेमकं काय घडलं?

उत्तरप्रदेशातील रामपूरमधील एका पोलीस अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Uttar Pradesh CM Yogi Adityanath
Uttar Pradesh CM Yogi AdityanathSaam TV

Uttar Pradesh News : उत्तरप्रदेशातील रामपूरमधील एका पोलीस अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पोलीस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी कडक कारवाई केली आहे. या लाचखोर अधिकाऱ्याला थेट हवालदार बनवा, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृह विभागाला दिले आहेत.

Uttar Pradesh CM Yogi Adityanath
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डीझेल लवकरच स्वस्त होणार, मोदी सरकारचा काय आहे नवा प्लान?

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराबाबत शून्य धोरण स्वीकारलं आहे. सीएम योगींनी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील रामपूरचे कार्यक्षेत्र अधिकारी (Police) डीएसपी विद्या किशोर शर्मा यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

या व्हिडीओत शर्मा यांनी बलात्काराचे आरोप झालेल्या एका पोलीस निरीक्षकाकडून ५ लाखांची लाच स्वीकारत असल्याचं दिसून आलं होतं. या पोलीस निरीक्षकावर एका महिलेने सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता. आरोपानंतरही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.

Uttar Pradesh CM Yogi Adityanath
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा पावरफुल प्लॅन! शिंदेंसह ४० आमदारांना शिकवणार धडा?

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपासात सदरील पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर कडक कारवाई करत मुख्यमंत्री योगींनी डेप्युटी एसपींना पुन्हा हवालदार बनवण्याचे निर्देश दिलेत.

विद्या किशोर शर्मा यांची उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली होती. प्रमोशन मिळाल्यानंतर ते डेप्युटी एसपी म्हणून रुजू झाले होते. यापूर्वी देखील शर्मा यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी त्यांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. आताच्या चौकशीत तथ्य आढळून आल्याने त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ पदावर पाठवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com