UP News : घरात नवरा-बायको आणि २ मुलांचा आढळला मृतदेह; पोलिसांनी दार उघडताच परिसरात खळबळ

सीतापूर जिल्ह्यातील बिश्वन कोतवाली परिसरातील शहरात गॅस स्फोटात दोन मुलांसह एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
up news
up news - Saam Tv

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातून मोठं वृत्त समोर आलं आहे. सीतापूर जिल्ह्यातील बिश्वन कोतवाली परिसरातील शहरात गॅस स्फोटात दोन मुलांसह एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

up news
Mumbai : चोरटा एटीएममधून ४ महिन्यांपासून करायचा पैशांची चोरी; चोरीची अनोखी पद्धत पाहून पोलिसही चक्रावले

मिळालेल्या माहितीनुसार, सीतापुरमधील एक कुटुंब शनिवारी रात्री खोलीत गाढ झोपले होते. थंडीपासून बचाव होण्यासाठी त्यांनी पेट्रोमॅक्स जाळून झोपले होते. त्यामुळे वायुगळती आणि गुदमरून कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

झज्जर येथे राहणारा आसिफ (४०) एक मदरशात शिकवत होता. शनिवारी आसिफ त्याची पत्नी आणि दोन मुलासह खोलीत झोपला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी दीडच्या सुमारास त्याचा मित्र आसिफच्या घरी आला. त्याने दार ठोठावले. मात्र, त्याने बऱ्याच वेळा ठोठावल्यानंतरही उघडले नसल्याने त्याला संशय आला. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली.

up news
Mumbai News: मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा फोन, महाराष्ट्र ATS तपासाची चक्र फिरवली अन्...

पोलीस घटनास्थळी पोहचून दरवाजा तोडला. त्यावेळी चौघांचे मृतदेह पोलिसांना दिसले. तसेच त्यावेळी एलपीजीचाही उग्र वास येत होता. त्यांच्याजवळ पेट्रोमॅक्स जवळच ठेवण्यात आला होता. त्याचा उपयोग थंडीपासून बचाव करण्यासाठी केला जातो. घटनास्थळी पेट्रोमॅक्स गॅस पूर्ण संपला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबाचे मृतदेह आढळल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com