

६७ आयएएस अधिकाऱ्यांना मिळालं प्रमोशन
४ अधिकाऱ्यांची प्रमुख सचिव पदावर नियुक्ती
अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांची लवकरच बदली होणार
उत्तर प्रदेश सरकारने शुक्रवारी ६७ आयएएस अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळालं आहे. यातील चार आएएस अधिकाऱ्यांची प्रमुख सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यात २००१ बॅचचे अधिकारी शशी भूषण लाल सुशील, अजय कुमार शुक्ला, अपर्णा यू आणि एसवीएस रंगाराव यांचं प्रमोशन झालं आहे. तर २०१० बॅचच्या १९ आयएएस अधिकाऱ्यांना विशेष सचिव पदावरून सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना बढती मिळाल्यानंतर लवकरच बदली देखील होण्याची शक्यता आहे.
वर्ष २०१० बॅचच्या अधिकाऱ्यांमध्ये आयएएस अखंड प्रताप सिंह, कुमार प्रशांत, नेहा शर्मा, मोनिका रानी, शंभु कुमार, योगेश कुमार, नितीश कुमार, भवानी सिंह खंगारौत, संदीप कौर, दुर्गाशक्ती नागपाल, रवींद्र कुमार आणि ओमप्रकाश आर्य यांची सचिव पदावर पदोन्नती मिळाली आहे त्यांच्या वेतनाची श्रेणी १४४२००-२,१८,२०० रुपये करण्यात आली आहे.
बालाजी, आशुतोष निरंजन आणि सुजीत कुमार यांना सचिव पदावर प्रमोशन मिळालं आहे. या अधिकाऱ्यांना मिड कॅरिअर प्रशिक्षण प्रोग्राम फेज-४ पूर्ण करावा लागणार आहे. याच बॅचचे नगेंद्र प्रताप, दिव्य प्रकाश गिरी, कृष्ण कुमार आणि सुधा वर्मा यांना सचिव पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
वर्ष २०१३ बॅचच्या ३० अधिकाऱ्यांची निवड ग्रेड १,२३,१००-२,१५९०० रुपये करण्यात आली आहे. या बॅचमध्ये दिव्या मित्तल, राजकमल यादव, रवींद्र कुमार मांदड, सॅम्युअल पान एन, जिंतेद्र प्रताप सिंह, आलोक सिंह, शुभ्रांत शुक्ल, विशाल भारगद्वाज,धर्मेंद्र प्रताप सिंह, डॉ. विजय कुमार सिंह, धीरेंद्र सचान,डॉ.वंदना शर्मा, प्रेम प्रकाश सिंह, आर्यका अखौरी, सुनील कुमार वर्मा, अनीता वर्मा सिंह, प्रियंका निरंजन, सत्येंद्र कुमार, अपूर्वा दुबे, अनुज सिंह, हर्षिता माथुर, अविनाश कुमार, दीपा रंजन,रमेश रंजन, शिशिर, सत्य प्रकाश पटेल, डॉ. कांचन सरन, रघुवीर यांचा समावेश आहे.
वर्ष २०१२ च्या बॅचचे अधिकारी राजेश कुमार त्यागी यांना ग्रेड १,२३,१००-२,१५,९०० रुपये इतकी देण्यात आली आहे. वर्ष २०२२ बॅचच्या १३ अधिकाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये श्रृती शर्मा, गामिनी सिंगला, उत्कर्ष द्विवेदी, अभिनव जे जैन, डॉ. दीक्षा जोशी,सुनील कुमार धनवंता, पूजा साहू, रामेश्वर सुधाकर सब्बनवाड,प्रफुल्ल कुमार शर्मा, नेहा बायडवाल ,राममोहन मीन, आलोक प्रसाद, कुमार सौरभ यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.