Political News: अखिलेश यादवांचा मोठा डाव! काँग्रेससमोर ठेवली 'ही' अट, भाजपचं टेन्शन वाढणार?

Akhilesh Yadav On Congress: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. अशातच अखिलेश यादव यांनी काँग्रेससमोर मोठी अट ठेवली आहे.
Political News: अखिलेश यादवांचा मोठा डाव! काँग्रेससमोर ठेवली 'ही' अट, भाजपचं टेन्शन वाढणार?
Akhilesh Yadav On CongressSaam Tv
Published On: 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने तर जागावाटपाच्या चर्चेला सुरूवात देखील केली. तर दुसरीकडे भाजपने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मथुरेतील विचारमंथन सत्रानंतर भाजपही उत्तर प्रदेशात आपल्या वरिष्ठ मंत्र्यांना प्रचारासाठी उतरवत आहेत. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच अखिलेश यादव यांनी मोठा डाव टाकला असून काँग्रेससमोर एक मोठी अट ठेवली आहे. यामुळे भाजपचे देखील टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यामध्ये जागावाटपासंदर्भात १८ नोव्हेंबर रोजी बैठक होणार होती पण ही बैठक रद्द झाली. आता दोन्ही पक्षांमध्ये २२ नोव्हेंबरपासून चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने यासाठी ६ सदस्यीय समिती स्थापन केली होती. आता समाजवादी पार्टीने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यीय टीम तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे, या टीममध्ये २ डेटा तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. अखिलेश यादव यांनी काँग्रेससोबत जागावाटपावर अशा अटी ठेवल्या आहेत की, त्यामुळे भाजपसाठीही तणाव निर्माण होऊ शकतो.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने यापूर्वी उत्तर प्रदेशच्या निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. २०१७ मध्ये दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांचा उत्तर प्रदेशात मोठा पराभव झाला होता. अखिलेश यादव यांनी तेव्हाच्या पराभवातून आता सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी जागावाटप विजयी उमेदवारांच्या आधारावर होईल, अशी अट घातली आहे. अखिलेश यादव यांनी सांगितले की, ज्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतील त्या पक्षाला जागा मिळेल. यामुळे जागावाटपात काँग्रेसचा वाटा कमी होऊ शकतो. हे भाजपसमोर एक आव्हान उभे करते. १० वर्षांच्या कार्यकाळानंतर भाजपला सत्ताविरोधी लाटेचाही सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत जर काँग्रेसने कमकुवत उमेदवार उभे केले असते तर भाजपचा मार्ग सोपा झाला असता. मात्र आता बहुतांश जागांवर भाजपची समाजवादी पक्षाविरुद्धच लढत होण्याची अधिक शक्यता आहे.

२०१७ च्या पराभवानंतर यावेळी कोणतीही चूक होता कामा नये यासाठी अखिलेश यादव यांचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गोरखपूरमधील पीडीएच्या त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. समाजवादी पार्टीला जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये आपले वरिष्ठ स्थान कायम ठेवायचे आहे. पण जागावाटप समान व्हावे, असे काँग्रेस पक्षाने मत आहे. दोन्ही पक्षांमध्ये २२ तारखेला होणाऱ्या बैठकीनंतरच त्यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.