Uttar Pradesh: मला न विचारता आयब्रो का केले? शुल्लक कारणावरून VIDEO कॉलवर दिला तिहेरी तलाख

Tripal talak on video call: ४ ऑक्टोबर रोजी ही घटना घडलीये. मात्र मंगळवारी महिलेने तक्रार दाखल केल्यावर ही माहिती उघडकीस आली.
Uttar Pradesh
Uttar PradeshSaam TV
Published On

Uttar Pradesh Crime:

उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी तलाखची एक खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीने पतीची संमत्ती न घेता स्वत:चे आयब्रो केल्याने तिहेरी तलाख दिलाय. तिहेरी तलाखसाठी वापरलेल्या या कारणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर घटनेचा खुलासा झालाय.

Uttar Pradesh
Wardha Crime News : औषधी दुकानाचा सकारात्मक अहवालासाठी १० हजार रुपयांची मागणी; लाच स्वीकारताना निरीक्षकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी ही घटना घडलीये. मात्र मंगळवारी महिलेने तक्रार दाखल केल्यावर ही माहिती उघडकीस आली. गुलसबा असं महिलेचं नाव असून सलीम असं तिच्या पतीचं नाव आहे.

१ वर्ष आधी या दोघांचा विवाह झाला. लग्ना झाल्यावर दोघेही सौदी अरबमध्ये गेले. येथे सलीम एका खासगी कंपनीत काम करत होता. गुलसबा त्याच्यासोबत राहत होती. मात्र तिला तेथील वातावरण आवडत नव्हते त्यामुळे ती पुन्हा भारतात आली. पुढे तिला सासरच्या व्यक्तींकडून हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. त्यामुळे ती आपल्या माहेरी निघून गेली.

पोलिसांनी सांगितले की, ४ ऑक्टोबर रोजी महिलेने आपल्या पतीशी संवाद साधला होता. या दोघांमध्ये व्हिडीओ कॉलिंगवरून संभाषण झालं होतं. त्यावेळी पतीने महिलेचे डोळे पाहिले तर तिने आयब्रो केले होते. माझी परवानगी न घेता तू आयब्रो का केले असा प्रश्न त्याने तिला विचारला.

पत्नीने समाधनाकारक उत्तर न दिल्याने व्हिडीओ कॉलवरच पतीने तिला तिहेरी तलाख दिला आहे. तिहेरी तलाख असंविधानीक असल्याचा निर्णय साल २०१९ घेण्यात आला आहे. त्यामुळे पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

Uttar Pradesh
Mumbai Crime News: खळबळजनक..! सार्वजनिक शौचालयात महिलेचा मृतदेह आढळला जळालेल्या अवस्थेत; घातपाताचा संशय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com