Uttar Pradesh Crime News : I Love You... चांदणी तूच माझे सर्वस्व आहे, म्हणत फेसबुक लाईव्ह करून एका तरुणाने गोमती नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला.
उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊ शहरात हा धक्कादायक प्रकार घडला. राहुल असं मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी राहुलने घरात सुद्धा सुसाईड नोट लिहून ठेवली होती. मला माफ कर, मी माफीच्या लायक नाही, I Love You...चांदणी मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. तूच माझे सर्वस्व आहे.
काय आहे प्रकरण?
राहुल हा हजरतगंज येथील लाप्लेस कॉलनी येथील रहिवासी असून तो एका खासगी संस्थेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास तो फेसबुकवर लाईव्ह आला. राहुलने लाईव्ह येताच राहुलने माझ्या पत्नी आणि मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी विनंती केली. (Latest Marathi News)
"मला आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिला जात आहे. त्यामुळे खूप अस्वस्थ झालो असून आता मी गोमती नदीत उडी मारणार आहे. टोनी सिक्का आणि माझे शेजारी सुजित वर्मा, त्यांची मुलगी आणि भाची काही व्हिडिओ बनवून माझा छळ करत आहेत, त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहे", असं या तरुणाने आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे.
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी (Police) फेसबुक लाईव्ह व्हिडिओ आणि मृत राहुलच्या पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.यासोबतच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण लखनौच्या समता-भिमुख चौकातील गांधी सेतू पुलाशी संबंधित आहे.
येथे उभे राहून राहुलने ३ मिनिटे फेसबुक लाईव्ह केले.यादरम्यान त्याने अनेकांना त्रास (Crime News) दिल्याचा ठपका ठेवत त्याच्या मृत्यूला जबाबदार धरले आहे. यासोबतच राहुलने आपल्या कुटुंबियांनाही एक संदेश दिला आहे.
दरम्यान, राहुल फेसबुक लाईव्ह करत असताना त्याच्या कुटुंबीयांनी लगेचच त्याचा शोध घेत गांधी सेतू गाठला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. राहुल याने गोमती नदीत उडी मारली होती.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.