उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. काही गारुड्यांनी धावत्या ट्रेनमध्ये पुंगी वाजवत सापांना आपल्या टोपलीतून बाहेर काढलं आणि ट्रेनमध्ये सोडलं. यामुळे सर्वच प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला. आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशी ट्रेनमध्ये पळत सुटले. (Latest Marathi News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हावडाहून ग्वालेहरला जाणाऱ्या चंबळ एक्सप्रेसमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. नागपंचमीपूर्वी वनविभागाने गारुड्यांना पकडण्याची नोटीस काढली होती. त्यामुळे काही गारुडी शुक्रवारी या एक्सप्रेस ट्रेनमध्ये पळून आले. त्यांनी आपल्या जवळील साप दाखवून प्रवाशांना घाबरवण्यास सुरूवात केली.
गारुडींनी आधी प्रवाशांना घाबरवलं आणि पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. नकार दिल्यामुळे गारुड्यांना राग आला आणि त्यांनी पुंगी वाजवत आपल्या टोपलीतील सर्व साप बाहेर सोडले.
सदर घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आली. त्यानंतर काही सर्पमीत्र आणि पोलिसांचे एक पथक झाशी रेल्वे स्थानकात येऊन थांबले. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबण्याआधी थोडी स्लो झाली होती. त्यामुळे या सर्व गारुडींनी धावत्या ट्रेनधून उडी मारत पळ काढला. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.