Uttar Pradesh Crime: मुलाच्या हत्येचा घेतला भयंकर बदला! आधी स्वतःच जामीन मिळवून दिला अन्...

या शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलाची हत्या त्याची आई आणि तिच्या कथित प्रियकराने केली होती.
UP Crime
UP CrimeSaam Tv
Published On

UttarPradesh Crime: उत्तर प्रदेशातील खेरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मितौलीमधील एका व्यक्तीने आरोपीला मारून आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेतला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काशीराम असे आरोपीचे नाव आहे. तर शत्रुघ्न लाला असे मृताचे नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मारेकऱ्याने आधी तुरुंगात असलेल्या शत्रुघ्नला जामीन मिळवून दिला. आणि नंतर बाहेर आल्यानंतर त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

UP Crime
Sharad Pawar News : अजित पवारांवर साहेब खूष... साता-यात म्हणाले, अजितदादा बघताहेत आनंद आहे (पाहा व्हिडिओ)

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी धक्कादायक मार्ग अवलंबला. या व्यक्तीने आपल्या ओळखीतील एका वकीलाच्या मदतीने मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला जामीन मिळवून दिला आणि त्याला तुरुंगाबाहेर काढलं. (Latest Marathi News)

त्यानंतर याच व्यक्तीने मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीवर प्राणघातक हल्ला केला. या शेतकऱ्याच्या मुलाची हत्या करणारा आरोपी हा नात्यातील व्यक्तीच होता. तुरुंगातून आरोपीला बाहेर काढून त्याची हत्या करत या शेतकऱ्याने मुलाच्या हत्येचा सूड घेतला.

UP Crime
Sanjay Raut On NCP | Sharad Pawar यांच्या राजीनाम्याची कुणकुण संजय राऊतांना होती?

आईने प्रियकरासोबत मिळून केली होती हत्या

दरम्यान, या शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलाची हत्या त्याची आई आणि तिच्या कथित प्रियकराने केली होती. हा प्रियकर या कुटुंबाच्या नात्यामधील व्यक्तीच होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती ही 47 वर्षांची असून या व्यक्तीचं नावं शत्रुघ्न लाला असं आहे. लालाच्या डोक्यात 3 गोळ्या झाडण्यात आला. लालाचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या 50 वर्षीय काशी नावाच्या शेतकऱ्याने केल्याचं सांगितलं जात आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com