Aligarh Crime News: खळबळजनक! आजोबांनी मोबाईल काढून घेतल्याचा राग; दोघी बहिणी घरात गेल्या अन्... भयंकर घटनेने गाव हादरलं

Crime News Update: ही भयंकर घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील व परिसरातील लोक हादरले आहेत.
Aligarh Crime News
Aligarh Crime NewsSaamtv
Published On

Aligarh Crime News: सध्या तरुणाईला लागलेले मोबाईलचे (Mobile Addiction) वेड हे सर्वत्र चिंतेचा विषय ठरत आहे. मोबाईलच्या वेडात अनेकदा तरुण- तरुणी त्यांच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या अलिगडमधून समोर आली आहे.

अलीगडमध्ये आजोबांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून दोन बहिणींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या भयंकर प्रकाराने संपूर्ण गावातमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Aligarh Crime News
Maharashtra NCP Crisis: शरद पवार साहेबांचा 'आशीर्वाद' मिळाला का? भेटीनंतर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले...

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, अलीगडमध्ये (Aligarh Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन चुलत बहिणी घरातील सदस्यांना न सांगता मोबाईल वापरायच्या आणि गुपचूप मुलांसोबत बोलायच्या. त्यांचे आजोबा नाथू सिंह यांनी शेतात काम करत असताना नातवंडांना फोनवर बोलताना पाहिले. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघांकडून फोन हिसकावून घेतला.

याचा राग येऊन दोन्ही बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील व परिसरातील लोक हादरले आहेत. दोन्ही बहिणी एका मुलाशी गुपचूप बोलायच्या असे सांगितले जात आहे. कुटुंबीयांनी अज्ञात तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खुशबू आणि शालिनी अशी मृत बहिणींची नावे सांगण्यात येत आहेत.

Aligarh Crime News
Rasta Roko Andolan : वीज वितरण कंपनीवर ग्रामस्थांचा राेष, कळंब-लातुर महामार्गावरील लोहटा पुर्व गावात छेडलं रास्ता रोको आंदोलन

कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू (Khushboo) आणि शालिनी (Shalini) या दोघी बहिणी एकत्र राहत होत्या. खुशबूचे आई-वडील बाहेर काम करतात. आणि ती तिच्या काका, काकू आणि आजोबांसोबत अलीगढमध्ये राहत होती. तर शालिनीच्या वडिलांनी सांगितले की, 'खुशबूची एका मुलीशी मैत्री होती आणि त्याने तिला मोबाईल दिला होता.

मात्र आजोबांनी मोबाईल हिसकावल्यानंतर दोघींनीही घरी जावून गळफास घेतला. कुटुंबीयांच्या माहितीनंतर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आधी दोघी नियमित शाळेत जायच्या पण गेल्या काही दिवसांपासून दोघींनी शाळेत जाणे बंद केले होते, असे पोलिसांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com