Uttar Pradesh Accident : टवाळखोरांनी ओढणी खेचल्याने विद्यार्थिनीचा सायकलवरुन पडून मृत्यू, घटनेचा थरारक CCTV Footage समोर

CCTV Footage : उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
Uttar Pradesh Accident
Uttar Pradesh AccidentSaam TV

Uttar Pradesh Accident :

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टवाळखोरांच्या मस्तीत शाळेतून घरी निघालेल्या विद्यार्थिनीचा दुदैवी अंत झाला आहे. उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी शाळेतून सायकलवरून घरी निघाली होती. रस्त्यात दोन खोडकर भावांच्या मस्तीमुळे हा अपघात झाला. रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक विद्यार्थिनीच्या गळ्यातील ओढणी हिसकावला.  (Viral VIdeo)

Uttar Pradesh Accident
Heart Attack Death : उत्तर प्रदेशात जीम करताना तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, हृदयद्रावक VIDEO व्हायरल

अचानक ओढणी ओढल्याने विद्यार्थिनीचा तोल गेला आणि ती रस्त्यावर कोसळली. विद्यार्थिनी रस्त्याच्या मधोमध पडल्याने मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला.  (Latest News Update)

शुक्रवारी झालेल्या अपघाताला सामान्य अपघाताची घटना सांगून पोलिसांनी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र शनिवारी या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर सगळा प्रकार समोर आला.

Uttar Pradesh Accident
Hair Curly With Lighter: बापरे! लायटर गॅसवर तापवून केसांना केलं कर्ल; हेअरस्टाइलचा थरारक व्हिडीओ व्हायरल

यानंतर विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांत विनयभंग आणि मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी दोन भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हरसमहर येथील रहिवासी शाहबाज आणि त्याचा भाऊ अरबाज यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com