Accident News : वाऱ्याच्या वेगाने कार पळवली; नियंत्रण सुटताच बोलेरोला धडक; ४ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Car Accident News : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. हसनपूर-गजरौला मार्गावरील मनोटा पुलावर इर्टिगा आणि बोलेरो कारची समोरासमोर धडक झाली.
Uttar Pradesh Car Accident News
Uttar Pradesh Car Accident NewsSaam TV

उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. हसनपूर-गजरौला मार्गावरील मनोटा पुलावर इर्टिगा आणि बोलेरो कारची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ४ जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.

Uttar Pradesh Car Accident News
Terrorist Attack: वैष्णोदेवीजवळ भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शाहनवाज (वय १९) अबाद्दन (वय १८) तहसीम (वय १७) बबलू (वय १७) अशी मृत तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेही अल्लीपूर, गजरौला येथील रहिवासी होते.

रविवारी रात्रीच्या सुमारास ते हसनूर येथे जेवणासाठी गेले होते. तेथून गजरौला येथे परतत असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्त कारचा वेग खूपच जास्त होता, त्यामुळे हा अपघात झाल्याचं असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर तरुणांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला होता. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Uttar Pradesh Car Accident News
Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तब्बल ७ दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठाही जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com