श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ही सेवा या दोन्ही देशात लॉन्च करतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी ही सेवा लॉन्च करतील. यावेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ हेही उपस्थित राहणार आहेत.(Latest News)
भारत फिनटेक इनोव्हेशन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये खूप वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भागीदार देशांसोबत फिनटेक नवकल्पना शेअर करण्यावर अनेकवेळा भर दिलाय. तिन्ही देशांच्या या निर्णयाकडे त्याचाच नजरेतून पाहिले जात आहे.
ही युपीआयची सेवा श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी तसेच भारतात प्रवास करणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. मॉरिशसमधील RuPay कार्ड सेवांचा विस्तार मॉरिशसमधील RuPay व्यवस्थेवर आधारित कार्ड जारी करण्यास मॉरिशसच्या बँकांना सक्षम करेल. भारत आणि मॉरिशस या दोन्ही ठिकाणी व्यवहारांसाठी RuPay कार्डचा वापर सुलभ होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.