मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक विजयी झाले. या निवडणुकीत अजिंक्य नाईक बाजी मारली आहे.
महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र महसूल संघटनेचा निर्णय घेतला आहे.
हिंगोलीत शिवसेनेने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्का दिला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या कळमनुरी तालुक्यातील अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये काँग्रेस नेते अभय सावंत यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
ईशान्य मुंबईत काही वेळाच्या विश्रांतीनंतर पावसाने जोर घेतला आहे. सकाळपासूनच पडत असलेल्या पावसाने काही काळ दुपारी विश्रांती घेतली. आता संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोर घेतलेल्या पाहायला मिळाले. मात्र आता पावसाचा जोर कायम राहिला तर चाकरमान्यांचे हाल देखील होण्याची शक्यता आहे. रेल्वे मार्ग असेल किंवा वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २९ जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषण व जीवनगौरव पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार पाऊस सुरू आहे. उपनगरं तसेच मध्यवर्ती भागात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. धरण पाणलोटक्षेत्रात गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर असून ५ वाजेपर्यंत खडकवासला धरणात १७ टीएमसी पाणी होतं.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. भेटीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात निघालेली ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा आज अहमदनगरमध्ये पोहचली आहे. भगवान बाबा यांचे दर्शन घेऊन ही यात्रा पुढे निघाली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देतील असा विश्वास व्यक्त केला होता, त्यावर हाके यांनी जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि फ्रॉड गायकवाड आयोग जरी आणला तरी मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू शकत नाही. तुम्हांला राजकारणाची भाषा करायची असेल तर आम्हांला पण राजकारण करावा लागेल, अशी टीका केली आहे.
NEET परीक्षेच्या पेपरफुटीनंतर जवळपास ४० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. याचिकार्त्यांनी तब्बल २३ लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पेपरफुटीच्या प्रकरणाचा संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाल्याचा ठोस आधार असल्याशिवाय फेरपरीक्षेचे आदेश देवू शकत नसल्याचं म्हटलं आहे.
पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारण्यास गती येणार. पुणे मेट्रोसाठी ८१४ कोटी रुपयांची तरतूद. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली. पुणेकरांसाठी मेट्रोची स्वप्नपूर्ती लवकरच होणार.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात तक्रार दिली होती. पुणे पोलिसांनी २ वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थितीत राहिल्या नाहीत. पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता जिल्ह्यात साडेचार लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील माता-भगिनीचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना तसेच विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता जिल्ह्यात एकूण ४ लाख ९२ हजार ८८८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. या अर्थसंकल्पातून विकसित भारत संकल्पनेला बळ मिळेल. पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवला. 'नवरत्न' अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब, असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नाशिक नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव शरद पवार यांच्या व्यासपीठावर आले आहेत. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा आज निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा आहे. या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीतून उमेदवारीसाठी ते इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील त्यांनी भेट घेतली.
अतियश संतुलित बजेट आज मांडले असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. सामाजिक क्षेत्रात मोठी गुंतवणुक सरकारची सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशाला दिलासा देणारं बजेट आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी अर्थसंकल्पानंतर दिली आहे. बजेटमुळे देशाला नवी दिशा मिळेल, असं त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्राला बजेटमध्ये भोपळा मिळाला आहे. बिहार, आंध्र या राज्यांना मोठं पॅकेज दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी जुन्याच घोषणा पुन्हा नव्याने केल्या असल्याची टीका काँग्रेस खासदारांनी केली आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर मार्केट कोसळल्याचं समोर आलंय. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी तर निफ्टी 150 अंकांनी खाली आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्करोगाच्या रुग्णांसाठी आणखी 3 औषधांसाठी कस्टममधून सूट जाहीर केली आहे. तसेच, मोबाइल फोन आणि संबंधित भागांच्या बाबतीत, सरकारने मोबाइल फोन आणि चार्जरवरील मूलभूत कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
MSME आणि निर्माण क्षेत्रासाठी महत्त्वाचं ठरणाऱ्या कर्जांबाब मोठी घोषणा बजेटमधून करण्यात आली. MSME क्षेत्राच्या कठीण काळातही कर्ज सुरु ठेवण्यासाठी नव्या व्यवस्थेची घोषणा करण्यात आली. त्यासोबत मुद्रा लोनची मर्यादा १० लाखांवरुन आता २० लाख रुपये करण्यात आली आहे. मुद्रा लोनची मर्यादा वाढवल्यनं MSME क्षेत्राला मोठ्या प्रमाणाता प्रोत्साहन मिळेल, असं जाणकार सांगतात.
कर्ज बुडवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव बजेटमधून अर्थमंत्र्यांनी मांडलाय. कर्ज वसुली करणाऱ्या सरकारी संस्थांच्या अधिकारांत वाढ करण्यात येईल, असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलंय. तसंच वसुलीची प्रक्रिया वेगवान व्हावी, यासाठीही वसुली करणाऱ्या संस्थाचे खटले चालवण्यासाठी अतिरीक्त न्यायाधिकरणांची स्थापना केली जाईल, असंही अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करताना म्हटलंय.
मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलीय.
पायाभूत सुविधांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भांडवली खर्चासाठी 11.11 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे भारताच्या जीडीपीच्या ३.४ टक्के असेल.
अर्थसंकल्पात १ कोटी घरांसाठी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीय.
नव्या रोजगार निर्मितीसाठी २ लाख कोटींची तरतूद करण्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित असल्याचं सांगितलं आहे. अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्यावर भर देण्यात आलाय. तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद केल्याची माहिती दिलीय.
महागाई दर नियंत्रणात आहे, तर बजेटमध्ये MSME मध्ये अनेक योजना असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे.
कॉंग्रेस नेते नाता पटोले म्हणाले की, GST कायद्यातील घटना दुरुस्तीने केंद्राला सगळे अधिकार दिले आहेत. मित्रांना फायदा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा आहे. महागाई दर कमी व्हावा, ही प्रमुख अपेक्षा आमची आहे.
अर्थसंकल्पात महागाई, बेरोजगारी, शेती याविषयी काहीतरी तरतूद असेल. नोकरदार वर्गासाठी टॅक्समधे सरकार सवलत देईल, असं वाटतंय. ती दिली नसेल तर ही सगळ्यात मोठी निराशा असेल. महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार काही विशेष तरतूद शेतकऱ्यांसाठी करू शकत, अशी प्रतिक्रिया अर्थतज्ज्ञ डॉ. नरेश बोडखे यांनी दिलीय.
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात झालीय. बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आहेत. बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाणार आहे.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या संसदेत दाखल झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए आघाडीतील मंत्री देखील संसदेत पोहचले आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे काय स्वस्त आणि महाग होणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे
अर्थसंकल्प हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्यामध्ये सरकारचे उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा तसेच अनेक महत्त्वाचे आकडे असतात. त्यामुळे कडेकोट बंदोबस्तात अर्थसंकल्प तयार केला जातो आणि त्याची तयारी बजेट सादर होण्याच्या ६ महिने आधीपासून सुरू होते.
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी वाढला. निफ्टी 70 अंकांच्या वर होता. अचानक शेअर बाजारात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आलाय, की अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेची वार्षिक रक्कम ६००० रुपयांवरून ८००० रुपये केली जाऊ शकते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या असून थोड्याच वेळात त्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजच्या अर्थसंकल्पात काय सादर होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काँग्रेसने मोठी मागणी केली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करा, तसेच शेतकऱ्यांना किमान आधारभूत हमी देण्याबाबत अर्थसंकल्पात घोषणा करा, असं काँग्रेसने म्हटलंय.
सरकारने भांडवलदारांचे लाखो कोटी रुपयांचे बँक कर्ज माफ केले, तर मग शेतकऱ्यांचे का नाही? असा सवाल देखील काँग्रेसने विचारला आहे.
सकाळी 8.30: अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे, नॉर्थ ब्लॉकसाठी रवाना होतील.
सकाळी 9.00: बजेट तयार करणा-या टीमसोबत नॉर्थ ब्लॉक येथे फोटो सेशन
सकाळी 9:10: अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या टीमसह राष्ट्रपती भवनात पोहोचणार
सकाळी 9.45: अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेकडे रवाना
सकाळी 10.00: संसदेत प्रवेश करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री यांचे फोटोशूट
सकाळी 10.15: संसदेत मंत्रिमंडळाची बैठक
सकाळी 11.00: अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार
दुपारी 3.30 : अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद
सायं. 7:30: दूरदर्शनवर मुलाखत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या तिसऱ्या कार्यकालातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागून आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला साम टीव्हीवर पाहता येणार आहे. त्यामुळे आज दिवसभर साम टीव्हीचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.