Ukraine-Russia War: युक्रेनचा रशियावर 'ड्रोन' हल्ला ; युक्रेनकडून हल्ल्यात अमेरिकन ड्रोनचा वापर

Ukraine Attack On Russia War: युक्रेनने ड्रोनद्वारे मोठा हल्ला केल्याचा आरोप रशियाने केलाय. रशियाच्या कझान शहरातील इमारतीवर हा हल्ला करण्यात आलाय.
Ukraine Attack On Russia War
Ukraine-Russia War:Google
Published On

युक्रेनने ड्रोनद्वारे मोठा हल्ला केल्याचा आरोप रशियाने केलाय. रशियाच्या कझान शहरातील इमारतीवर हा हल्ला करण्यात आलाय. 50 मिनिटांच्या अंतराने ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलाय.. त्यामुळे रशिया युक्रेन युद्धाला वेगळं वळण लागलंय. पाहूया.

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध काही शांत होताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस याला वेगळं वळण लागतंय. नुकतेच युक्रेन सैन्यानं पुन्हा एकदा रशियाच्या कुस्के क्षेत्राला लक्ष्य करत हल्ला चढवला. अमेरिकन निर्मित ड्रोनने हा हल्ला केल्याची माहिती रशियानं दिलीये. युक्रेनने रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला केलाय.

Ukraine Attack On Russia War
Cancer Vaccine : कोरोनानंतर कॅन्सरचीही लस भारतात फ्री मिळणार का?

कजान शहरातील बहुमजली इमारतीवर हा ड्रोन हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात इमारतीला भीषण आग लागली आहे. कजान शहरातील बहुमजली इमारतीवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियन नागरिक हादरले आहेत. या हल्ल्ल्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे रशियाकडून सांगण्यात आलंय. ड्रोन हल्ल्यात शहरातील अनेक इमारतींचं नुकसान झालंय. युक्रेन सैन्याकडून 8 ड्रोन्सनं 6 इमारतींवर हल्ले करण्यात आले.

Ukraine Attack On Russia War
Russia- Ukraine War: रशियाला मदत करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून कारवाई; भारताच्या चार कंपन्यांवर निर्बंध

हल्ल्यात कल्चर हाऊस,प्राथमिक शाळा, रिल्स्क एव्हिएशन कॉलेज आणि रिसर्च सेंटरचं नुकसान झालं तर 15 हून अधिक वाहनांचं नुकसान झालंय. मात्र युक्रेनने कझान शहराला का लक्ष्य केलं पाहूया.

युक्रेनचा ड्रोन स्ट्राईक कझानवर का?

कझान शहर रशियाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं

रशियाच्या औद्योगिक आणि आर्थिक केंद्रांपैकी महत्त्वाच शहर

देशातील मॅकॅनिकल इंजिनियरिंग, पेट्रोकेमिकल प्रकल्प याच शहरात

रशियातील सर्वात मोठे IT-पार्कही इथेच

जगातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर उत्पादकांपैकी एक 'कझान हेलिकॉप्टर प्लांट' याच शहरात

यानंतर आता रशियाकडून युक्रेनला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाची दाहकता वाढणार एवढं नक्की. नव्या वर्षात याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर कसे परिणाम होणार आणि त्याचा भारतावर कसा परिणाम होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com