Yagi Cyclone : यागी चक्रीवादळाचा चीनला तडाखा; बेफाम वाऱ्यामुळे पिके भुईसपाट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

Typhoon Yagi Latest Updates : चीनमध्ये 'यागी' या शक्तिशाली चक्रीवादळाने झाडांची पडझड झाली असून फळबागा तसेच शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
typhoon yagi Marathi News
typhoon yagi Marathi NewsSaam TV
Published On

चीनमध्ये 'यागी' या शक्तिशाली चक्रीवादळाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हैनान प्रांताला पावसासह वादळाचा तडाखा बसल्याने घरांवरील छते उडून गेली आहेत. याशिवाय झाडांची पडझड झाली असून फळबागा तसेच शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

आतापर्यंत या चक्रीवादळात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये हैनान प्रांतातील ३ तर व्हिएतनाममधील ४ जणांचा समावेश आहे. दोन्ही शहरात मिळून १५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

typhoon yagi Marathi News
Weather Update : राज्यात पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार, आज 'या' जिल्ह्यांमध्ये धुव्वाधार बरसणार

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. व्हिएतनामच्या हवामान शास्त्रज्ञांनी यागी चक्रीवादळाला वर्णन सर्वात विनाशकारी चक्रीवादळ असं केलंय.

गेल्या दशकातील या प्रदेशातील यागी हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळांपैकी एक आहे, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलंय. या चक्रीवादळाचा वेग ताशी १५० ते १६६ किलोमीटर इतका आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चिनी सरकारने अनेक सूचनाही जारी केल्या आहेत.

पूरग्रस्त आणि भूस्खलन झालेल्या भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. चक्रीवादळामुळे राजधानी हनोई आणि हैफॉन्ग या बंदर शहरासह ४ विमानतळे बंद करण्यात आली आहेत. अनेक विमान उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहे.

चक्रीवादळासोबत आलेल्या मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे चीनमधील 8 लाखांहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. 'यागी' चक्रीवादळ शनिवारी टोंकीनच्या आखातावरून उत्तर व्हिएतनामच्या दिशेने सरकले. यागी हे चीनच्या किनारपट्टीला धडकणारे या वर्षातील 11 वे चक्रीवादळ आहे.

चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

हवामान तज्ज्ञांच्या मते, चीनमध्ये धडकलेल्या यागी या चक्रीवादळाचा काही परिणाम भारतातील हवामानावर परिणाम देखील झाला आहे. यागीमुळे देशातील बहुतांश भागात पाऊस पडत असून आणखी काही दिवस तो कायम राहण्याची शक्यता आहे.

यागी चक्रीवादळाचा सर्वात जास्त परिणाम सागरी किनारपट्टीला लागून असलेल्या राज्यांवर झाला आहे. यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. महाराष्ट्रावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही असं सांगण्यात आलंय.

typhoon yagi Marathi News
Jayakwadi Dam : जायकवाडीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ; आता किती टक्के भरलं धरण? पाहा आजची आकडेवारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com