Agra News: दोन बायका फजिती एका! दोन महिलांनी केला एकच पतीवर दावा

Two Women Claim Same Husband: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून 'पती, पत्नी और वो' अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी दोन महिलांनी एकाच पतीवर दावा केला आहे.
Agra News
Agra NewsSaam Tv News
Published On

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून 'पती, पत्नी और वो' अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी दोन्ही महिलांनी एकाच व्यक्तीला पती असल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही तर, दोघींनीही पोलीस ठाण्यात एकाच पतीवरुन एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोघींनीही पोलीस ठाणे जरी गाठले असले तरी, या प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेत पोलिसांनी ही केस कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे वर्ग केली आहे.

कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहचली केस

दोन्ही महिलांनी एकाच व्यक्तीला पती असल्याचा दावा केला आहे. नंतर त्या व्यक्तीसह दोन्ही महिला गुरूवारी कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचले. समुपदेशनादरम्यान दोघींनी एकाच व्यक्तीला पती असल्याचा दावा करत तक्रार नोंदवली. त्यातील एका महिलेनं समुपदेशकाला सांगितले की, तिचे २०२० साली त्या व्यक्तीसह लग्न झाले. तर दुसऱ्या महिलेनं २०२२ साली लग्न झाल्याचं सांगितलं.

Agra News
Crime News: बहिणीच्या अंत्यसंस्काराला गेला आणि भावोजीला जळत्या चितेवर फेकला, मेहुण्याचा धक्कादायक प्रताप

मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीनं पहिले लग्न झाल्याचं घरात सांगितलं नाही. तो पहिल्या पत्नीसोबत दुसऱ्या ठिकाणी राहत आहे. त्यानंतर २०२२ साली तरूणाच्या घरच्यांनी त्याचं लग्न एका मुलीशी लावून दिलं होतं. ही बाब लक्षात आल्यानंतर समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी दोन्ही महिलांना पुढील तारखेला आपापल्या विवाहाचे पुरावे आणण्यास सांगितले. यासोबत महिला आणि तरूण दोघांनाही त्यांच्या कुटुंबाला सोबत आणण्यास सांगितले.

Agra News
Nagpur Crime: वहिनीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कुख्यात गुंडाची हत्या, तरुणाने डोक्यात घातला दांडा

पुढे समुपदेशक डॉ. सतीश खिरवार म्हणतात, हे अत्यंत विचित्र प्रकरण आहे. दुसऱ्या मुलीचे म्हणणे आहे, तिचे २०२२ साली लग्न झाले होते. तिच्या पतीनं बेकायदेशीर लग्न केलं आहे. समुपदेशनदरम्यान, तरूणानं सांगितलं की, त्याची पत्नी त्याला इतर मुलींशी बोलण्यास मनाई करते. आता माझ्या नोकरीत मला सगळ्यांशी बोलावं लागतं. मात्र हे प्रकरण गुंतागुंतीचे असून, पती आणि दोन्ही महिलांना पुढील तारखेला बोलवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com