
तुर्कीमध्ये एअर अॅम्बुलन्सचा अपघात होऊन २ पायलटसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तुर्कीतील अनारका शहरात ही अपघाताची घटना रविवारी घडली आहे. हेलिकॉप्टर रुग्णालयात इमारतीला धडकल्यानंतर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.
तुर्कीतील आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या अपघाताविषयी माहिती दिली आहे. या अपघातात दोन पायलट, डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचारी होते. एअर अॅम्बुलन्स हे चार मजली इमारतीला धडकलं. एअर अॅम्बुलन्समधील लोकांशिवाय कोणालाही दुखापत झालेली नाही. दाट धुक्यांमुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळवरील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर इमारतीचा ढिगारा परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. या घटनेची माहिती मिळताच अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचल्या.
या वर्षीच्या सुरुवातीला यूएसच्या ओक्लाहोमा राज्यात एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. तिन्ही जण चालक पथकाचे सदस्य होते. २१ जानेवारी रात्री साडे अकरा वाजता एअर अॅम्ब्युलन्सवरील नियंत्रण गमावल्याने अपघात झाला होता. यानंतर अॅम्बुलन्सचा वेदरफोर्डजवळ अपघात झाला होता.
काही वर्षांपूर्वी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयाच्या एअर अॅम्ब्युलन्स थायलँडची राजधानी बँकॉकमध्ये क्रॅश झालं होतं. या घटनेत पायलटचा जागीच मृत्यू झाला होता. तर ४ जण जखमी झाले होते. या अपघातानंतर बँकॉक परिसरात एकच खळबळ उडाली होती. अॅम्ब्युलन्स नवी दिल्लीवरून रवाना झालं होतं. एअर अम्बुलन्स कोलकाता येथेही थांबलं होतं. याच एअर अॅम्ब्युलन्सचा नाखोन पाथोम एअरपोर्टजवळ क्रॅश झालं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.