Japan Earthquake News : जपान शक्तीशाली भूकंपाने हादरला; समुद्राकिनारी भागात त्सुनामीचा इशारा

Earthquake News : भूकंपानंतर सरकारने समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात त्सुनामीचा इशारा दिला आहे.
Earthquake
Earthquakesaam Tv
Published On

Japan Earthquake :

जपान आज तीव्र भूकंपाने हादरला आहे. भूकंपाची तीव्रता 6.6 रिक्टर स्केल इतकी मोजण्यात आली. भूकंपाचे जोरदार हादरे बसल्यानंतर नागरिकांची मोठी पळापळ झाली.

भूकंपानंतर सरकारने समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात त्सुनामीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने जपानच्या इझू बेटावर 1 मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

तर पूर्वेकडील चिबा प्रांतापासून पश्चिमेकडील कागोशिमा प्रीफेक्चरपर्यंत पसरलेल्या भागात 0.2 मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे.

खबरदारी म्हणून किनारपट्टी भागातील लोकांना उंच ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Earthquake
Sikkim Floods : सिक्कीममधील पुरात 14 जणांचा मृत्यू, 102 नागरिक बेपत्ता; ISRO ने शेअर केले सॅटलाईट फोटो

2011 मध्ये झालेल्या प्रचंड भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीने उत्तर जपानचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला होता. यात फुकुशिमा अणू प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com