Boat Capsized:धक्कादायक! प्रवाशांनी भरलेली बोट नदीत बुडाली, ८६ जणांचा मृत्यू

Boat Accident: काँगोच्या इक्वेट्यूर प्रांतात झालेल्या एका भयानक बोट अपघातात विद्यार्थ्यांसह ८६ जणांचा मृत्यू झालाय. रात्रीच्या प्रवासादरम्यान बासंकुसु नदीत जहाज बुडाले.
Boat Accident
Congo boat tragedy: Overcrowded passenger vessel capsized in Basankusu, killing 86 people.saam tv
Published On
Summary
  • काँगोच्या बासंकुसु परिसरात मोठी बोट दुर्घटना.

  • आतापर्यंत ८६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी.

  • क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व सामानामुळे अपघात.

आफ्रिकन देश काँगोमध्ये एक मोठी बोट दुर्घटना घडली असून यात किमान ८६ जणांचा मृत्यू झाला. ही घटना बासंकुसु परिसरात घडली आणि मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. वायव्य भागातील काँगोमधील इक्वेटर प्रांतात ही दुर्घटना झालीय. सरकारी वृत्तसंस्थेनुसार, मोटार बोट उलटल्याने हा अपघात झाला. बोटीत आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवासी आणि सामान होते. दरम्यान ही बोट रात्रीच्या वेळी प्रवास करत होती.

ऐन नदीच्या मध्य भागी असताना बोटाचं नियंत्रण सुटून तोल बिघडला आणि बोट नदीत उलटली. आतापर्यंत ८६ मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. अजूनही अनेक लोक बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. नदीकाठच्या गावातील लोकही या शोध मोहिमेत मदत करत आहेत. (Congo Boat Accident: 86 Dead After Passenger Vessel Capsizes In Basankusu)

Boat Accident
Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

सर्वात दुखदायक बाब म्हणजे मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी शहरात शिक्षण घेण्यासाठी जात होते. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या अपघातासाठी तेथील वृत्तपत्रांनी नाव चालवणाऱ्या प्रशासनाला दोषी ठरवलंय. रात्रीच्यावेळी नेव्हिगेशन व्यवस्थीत नव्हते. तर बोटीवर जास्त प्रवाशी आणि वस्तू चढवण्यात आल्यानं हा अपघात घडल्याचं तेथील वृत्तांनी म्हटलंय. कॉन्गोमध्ये बोटीचा अपघात होण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधीही ओव्हरलोडिंग आणि पुरेसी काळजी न घेतल्यानं अशा घटना आधीही घडल्या आहेत.

Boat Accident
Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com