Horrific Accident : भीषण अपघातात भाजप नेत्यासह दोघांचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

madhya pradesh Horrific Accident : मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात भाजप नेत्यासह दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
madhya pradesh Horrific Accident
BJP leader deathSaam tv
Published On
Summary

लक्ष्मण सागर तलावाजवळ शनिवारी रात्री भीषण अपघात

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत नायक यांचा अपघातात मृत्यू

कारने ऑटोला धडक दिली, त्यानंतर ती थेट तलावात कोसळली

मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव कारने ऑटो रिक्षाला धडक दिली. त्यानंतर कार थेट तलावात कोसळली. यात भाजप युवा मोर्चाचे युवा नेते आणि त्याचा मित्राचा अपघाती मृत्यू झाला.

पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही अपघाताची माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितलं की, जिल्हा मुख्यालयाच्या जवळ २२ किलोमीटरपासून लांब लक्ष्मण सागर तलावाजवळ शनिवारी रात्री साडेअकरा वाजता अपघात झाला. कारमधील दोघांनी तलावातील पाण्यात पोहत किनाऱ्यावर येऊन जीव वाचवला.

पोलीस ठाण्याचे प्रभारी आरपी मिश्रा यांनी सांगितलं की, भाजप युवा मोर्चाचे बिलहरि मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नायक हे त्यांचे मित्र विकास तिवारी, अभिषेक चौरसिया आणि अमन ताम्रकर यांच्यासोबत घरी जात होते. त्याचवेळी त्यांच्या कारच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे भीषण अपघात झाला.

madhya pradesh Horrific Accident
व्हीव्हीपॅट पावत्यांचा रस्त्याच्या कडेला ढीग; दोन अधिकारी निलंबित, आयोगाकडूनही स्पष्टीकरण

भाजप नेत्याची कार रिक्षाला धडकून तलावात कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर कारमधील दोघांनी पोहून जीव वाचवला. प्रशांत नायक आणि विकास तिवारी यांचा मृत्यू झाला. तर चौरसिया आणि ताम्रकर यांनी स्वत:चा जीव वाचवला.

madhya pradesh Horrific Accident
मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

अपघातानंतर नेमकं काय घडलं?

कार तलावात कोसळताना चौरसियाने कारचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने तलावात उडी मारली. चौरसियानंतर त्याच्या बाजूला बसलेल्या ताम्रकरनेही तलावात उडी मारली. चौरसियाने नायक आणि तिवारीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण वेळेत दरावाजा न उघडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Q

अपघात कुठे घडला?

A

भीषण अपघात मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात लक्ष्मण सागर तलावाजवळ झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com