Kanger Valley : मुसळधार पावसाचा कहर, कार पुराच्या पाण्यात वाहून गेली, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Chhattisgarh news : छत्तीसगडमध्ये कांगेर व्हॅली परिसरात मुसळधार पावसामुळे कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या अपघातात तामिळनाडूतील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून आहे.
Kanger Valley : मुसळधार पावसाचा कहर, कार पुराच्या पाण्यात वाहून गेली, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
Chhattisgarh NewsSaam Tv
Published On
Summary
  • छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये कांगेर व्हॅली परिसरात कार पुराच्या पाण्यात वाहून गेली.

  • या अपघातात तामिळनाडूतील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.

  • पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा दुर्दैवी अंत झाला, चालक मात्र वाचला.

  • मुसळधार पावसामुळे झालेल्या या घटनेने सुरक्षित प्रवासाचा धडा दिला.

छत्तीसगडमधील जगदलपूर येथे एक भीषण अपघात घडला आहे. मंगळवारी सायंकाळी दरभा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कांगेर व्हॅली परिसरात मुसळधार पावसामुळे एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि त्यात प्रवास करणाऱ्या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील पती-पत्नी व दोन लहान मुले यांचा समावेश आहे.

मृत कुटुंब तामिळनाडूचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. कार मालक राजेश (वय ४३) हा रायपूर येथे कंत्राटदार म्हणून काम करत होता. तो आपल्या पत्नी पवित्रा (वय ४०), सात वर्षांच्या मुलगा सौजन्य आणि चार वर्षांच्या चिमुकली सौम्या यांच्यासह तीरथगड धबधबा पाहण्यासाठी कारने निघाला होता. मुसळधार पावसामुळे कांगेर व्हॅली परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत होते. दरम्यान, नदीसारखा वेग घेऊन आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोटात गाडी अडकली आणि काही क्षणातच ती खोल नाल्यात ओढली गेली.

Kanger Valley : मुसळधार पावसाचा कहर, कार पुराच्या पाण्यात वाहून गेली, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, २७ माओवाद्यांचा खात्मा

स्थानिकांनी आरडाओरड केली आणि तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. दरभा पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तासंतास शोधमोहीम राबवल्यानंतर अखेर चारही जणांचे मृतदेह सापडले. मृतदेह मेकाझा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोस्टमार्टमनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील.

Kanger Valley : मुसळधार पावसाचा कहर, कार पुराच्या पाण्यात वाहून गेली, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
Chhattisgarh Accident : चिमणीनं घात केला, कारखान्यात भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली २५ हून अधिक मजूर दबले, ८ मृत्यू

अपघातावेळी कारचा चालक मात्र कसाबसा वाचला. तो पुराच्या पाण्यातून पोहत जवळच्या झाडाला धरून जीव वाचवण्यात यशस्वी झाला. त्याने बचाव पथकाला माहिती दिली आणि त्यामुळे चौघांचे मृतदेह शोधणे शक्य झाले. या दुर्घटनेमुळे एकाच कुटुंबाचा उजाडलेला संसार पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Kanger Valley : मुसळधार पावसाचा कहर, कार पुराच्या पाण्यात वाहून गेली, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये धुमश्चक्री, चकमकीत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

दरम्यान, पावसामुळे कांगेर व्हॅली परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. पर्यटकांनी अशा हवामानात पर्यटनस्थळांकडे जाणे टाळावे, असे प्रशासनाने वारंवार आवाहन केले आहे. तरीही अनेकदा निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना घडतात. तीरथगड धबधबा हा परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, पावसाळ्यात तो अधिक आकर्षक दिसतो. याच मोहात अनेक कुटुंबे येथे गर्दी करतात. मात्र, यावेळी या कुटुंबासाठी हा प्रवास जीवघेणा ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com