
फरिदाबादमधील ग्रीन फील्ड कॉलनीत स्प्लिट एसीला आग लागून भीषण स्फोट झाला.
या स्फोटामुळे आई-वडील आणि मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाला.
धुरामुळे गुदमरून तिघांचा जीव गेला असून, पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला.
पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत.
हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. रविवारी मध्यरात्री ग्रीन फिल्ड कॉलनीतील एका घरामध्ये एसीचा भीषण स्फोट झाला. फर्स्ट फ्लोअरवर एसीचा स्फोट झाला आणि सेकंड फ्लोअरवर झोपलेल्या आई-वडिलांसह एका चिमुकलीचा मृत्यू झाला. या स्फोटामध्ये घरातील पाळीव कुत्र्याचा देखील मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सचिन कपूर, त्यांची बायको रिंकू कपूर आणि मुलगी सुजान कपूर या तिघांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली. कपूर कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या सर्वांना मोठा धक्का बसला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, रात्री अचानक स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर घरातून धूर आणि आगीचे लोट आल्याचे दिसू लागले. स्थानिकांनी तात्काल अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घरामध्ये प्रचंड धूर होता. धुरामुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत कुत्रा देखील वाचला नाही.
ज्या घरामध्ये एसीचा स्फोट होऊन आग लागली त्या घराच्या मालकाने सांगितले की, 'मी माझ्या मुलीसोबत राहते. मध्यरात्री ३:१० वाजताच्या सुमारास आमच्या स्प्लिट एसीला आग लागली. मी सर्वांना उठवले आणि पळत बाहेर गेलो. आग विझवण्याचा आम्ही प्रयत्न करताना माझे हातही भाजले.' या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
कपूर कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी राहत होते. त्यांचे परिसरातील सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे ग्रीन फील्ड कॉलनीमध्ये शोककळा पसरली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि बिघडलेले आढळल्यास त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.