Agustin Escobar: तो प्रवास ठरला अखरेचा! हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीमेन्स कंपनीच्या CEOचे अख्खं कुटुंब संपलं, शेवटचा VIDEO व्हायरल

America Helicopter Crash: अमेरिकेत हेलिकॉप्टर नदीमध्ये कोसळले. या अपघातामध्ये पायलटसह ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीच्या सीईओचे अख्खं कुटुंब संपलं. त्यांचा हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीचा शेवटचा फोटो व्हायरल झाला आहे.
Agustin Escobar: तो प्रवास ठरला अखरेचा! हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीमेन्स कंपनीच्या CEOचे अख्खं कुटुंब संपलं, शेवटचा VIDEO व्हायरल
Agustin Escobar With Family Saam Tv
Published On

अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये हेलिकॉप्टरला अपघात झाला. १० एप्रिल २०२५ रोजी हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात स्पेनमधील सीमेन्सचे अध्यक्ष आणि सीईओ ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी मर्स कॅम्परुबी मोंटल, त्यांची ३ मुलं आणि हेलिकॉप्टरचा पायलट असे एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरमध्ये हवेतच बिघाड झाला आणि ते नदीत कोसळले.

हिंदुस्तान टाईम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, ऑगस्टिन आणि त्याचे कुटुंब सुट्टी एन्जॉय करण्यासाठी स्पेनमधील बार्सिलोना येथून न्यूयॉर्कला आले होते. ते न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध हेलिकॉप्टर टूरवर होते. या टूरद्वारे पर्यटकांना शहराचे हवाई दृश्य दाखवले जाते. ऑगस्टिन आणि त्यांच्या कुटुंबीयांचा हवाई टूर इन्जॉय करण्याचा आनंद फार काळ टिकला. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांचे हेलिकॉप्टर नदीत कोसळले आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी ऑगस्टिन यांनी कुटुंबीयांसोबत फोटो काढला होता. हा फोटो आणि प्रवास त्यांचा अखेरचा ठरला.

Agustin Escobar: तो प्रवास ठरला अखरेचा! हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीमेन्स कंपनीच्या CEOचे अख्खं कुटुंब संपलं, शेवटचा VIDEO व्हायरल
Pune Helicopter Crash : तटकरेंना घेण्यासाठी जाताना दुर्घटना; हेलिकॉप्टर अपघातात 2 कॅप्टनसह एका इंजिनिअरचा मृत्यू, VIDEO

प्रत्यक्षदर्शींच्या मते , हेलिकॉप्टर अचानक नियंत्रणाबाहेर गेले. हेलिकॉप्टरचे शेपटीचे रोटर आणि ब्लेड वेगळे झाले आणि ते वेगाने नदीत कोसळले. नदीत पाणी जास्त असल्याने हेलिकॉप्टर बुडाले. या अपघाताच्या एक महिना आधी ऑगस्टिन एस्कोबार हे मार्च २०२५ मध्ये भारतात आले होते. त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये त्यांनी भारत भेटीचे संस्मरणीय वर्णन केले होते. त्यांनी लिहिले होते की, 'सीमेन्स मोबिलिटी रेल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी माझी भारत भेट अविश्वसनीय होती. बंगळुरू, पुणे आणि मुंबई येथील आमच्या टीमला भेटणं प्रेरणादायी होते. संशोधन आणि विकास प्रयोगशाळांपासून ते उत्पादन युनिटपर्यंत मी सर्वत्र नावीन्य पाहिले.'

Agustin Escobar: तो प्रवास ठरला अखरेचा! हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीमेन्स कंपनीच्या CEOचे अख्खं कुटुंब संपलं, शेवटचा VIDEO व्हायरल
Jalgaon Accident : आईला बोलून घरातून निघाला अन्; भरधाव गाडीने दुचाकीला उडविले, दोघांचा मृत्यू

ऑगस्टिन एस्कोबार २७ वर्षे सीमेन्स कंपनीमध्ये कार्यरत होते. १९९८ मध्ये त्यांनी स्पेनमध्ये पॉवर ऑटोमेशन सिस्टीम्ससाठी विक्री आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख म्हणून काम सुरू केले. कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर ते २०२२ मध्ये सीमेन्स स्पेनचे अध्यक्ष आणि सीईओ झाले. ते सीमेन्स मोबिलिटी साउथवेस्ट युरोपचे सीईओ देखील होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक देशांमध्ये ऊर्जा, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Agustin Escobar: तो प्रवास ठरला अखरेचा! हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीमेन्स कंपनीच्या CEOचे अख्खं कुटुंब संपलं, शेवटचा VIDEO व्हायरल
Local Accident: धावत्या लोकलमधून पडून आणखी एकाचा बळी, अंबरनाथहून उल्हासनगरला जात असताना अपघात; जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com