Petrol Diesel Prices : खुशखबर! कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? पाहा आजचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने खाली उतरल्या आहेत.
Petrol Diesel Prices Today
Petrol Diesel Prices TodaySaam TV

Petrol Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने खाली उतरल्या आहेत. कच्च्या तेलाचे (Crud Oil) दर गेल्या 7 महिन्यातील निचांकी स्तरावर पोहोचले आहेत. आज ब्रेंट क्रूड ऑइल 90 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यापार करत आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी होता भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. (Petrol Diesel Price Today in Mumbai Maharastra)

Petrol Diesel Prices Today
Pune Accident : पुण्यात मोठी दुर्घटना! भरधाव कंटेनरने तब्बल २४ वाहनांना उडवलं; अनेकजण जखमी, पाहा PHOTO

आजचा पेट्रोल डिझेलचा भाव काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव घसरले असले तरी देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मात्र स्थिर आहेत. आता या नवीन घडामोडींमुळे देशातही पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) स्वस्त होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 35 पैशांनी 96.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 32 पैशांनी 89.82 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

गाझियाबादमध्येही पेट्रोल 18 पैशांनी 96.40 रुपये आणि डिझेल 17 पैशांनी 89.58 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढून 96.57 रुपये प्रति लीटर तर डिझेल 12 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

Petrol Diesel Prices Today
Shraddha Walker Case : श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांना सापडले महत्वाचे पुरावे; आबताब लटकणार!

मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर पेट्रोलच्या दरात कमाल 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com